नाशिक - एसटी आंदोलनातील ( St worker Strike ) कर्मचाऱ्यांनी 22 तारखेपर्यंत कामावर परतावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कामावर रुजू होणार्या कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील पाच दिवसांत कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 275 झाली ( Nashik ST Worker Resume ) आहे.
एसटी विलिगीकरण्याच्या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशानंतर आता कामावर परतावे लागणार आहे. 22 तारखेपर्यंत कामावर परतण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे रुजू होऊ इच्छिणाऱ्या कर्मचार्यांकडून अर्ज प्राप्त होत आहे. कर्मचारी कामावर येत असल्याने बसेसची संख्या देखील वाढत आहे. सध्या नाशिक विभागात 275 पेक्षा अधिक बस धावत आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या देखील वाढत आहे. पुढील काही दिवसांत बसेसच्या संख्येत आणखी वाढ होणार असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे.
कर्मचाऱ्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरु - कामावर रुजू होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत. अशा कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकारी कर्मचारी मित्रांनाही कामावर रुजू होण्याचा सल्ला दिला आहे. आता न्यायालयानेच हजर होण्यास सांगितल्याने तूर्तास रुजू होण्याशिवाय पर्याय नसल्याने कर्मचारी एकमेकांना सांगत आहेत. तर, काही कर्मचारी मात्र अजूनही रुजू होण्याच्या मानसिकतेत नाही. त्या कर्मचाऱ्यांची मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहे.
हेही वाचा - Ajit pawar : मोबाईल रिचार्ज प्रमाणे विजेसाठी प्रिपेड कार्ड आणण्याचा राज्य सरकारचा विचार - अजित पवार