नाशिक - नाशिक महापालिकेची मुदत (Nashik Corporation) येत्या 15 मार्चपर्यंत आहे. निवडणुका विहित वेळेत होत नसल्यामुळे महापालिकेचा कारभार प्रशासकामार्फत चालवला जाणार (Administrative rule in Nashik Corporation) आहे. यासाठी आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. नगरविकास विभागाने यासंदर्भात आदेश दिले आहेत.
मनपा आयुक्त कैलास जाधव यांची नेमणूक-
14 मार्चपासून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आयुक्त कैलास जाधव महानगरपालिकेचे कामकाज बघणार आहेत. विहित वेळेत महापालिका निवडणूक होत नसल्याने अखेर महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे.
महापौरांना बंगला सोडावा लागणार -
नाशिक महापालिका प्रशासनाकडून महापौरांसह लोकप्रतिनिधींना दिल्या जाणाऱ्या सुविधा यात वाहने व इतर सुविधा याबाबत रीतसर नोटीस काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. लवकरच महापौर निवासस्थान असलेल्या रामायण बंगल्याचाही ताबा मनपा प्रशासन घेणार आहे.