ETV Bharat / city

वृद्धाच्या हत्येप्रकरणी नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिकासह 20 जणांवर मोक्का - nashik news

या टोळीचा मास्टरमाइंड रम्मी राजपूत, सचिन मंडलिक, बांधकाम व्यवसायिक बाळासाहेब कोल्हे याच्यासह 20 जणांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. राज्यात भूमाफियांविरोधात ही पहिलीच कारवाई असल्याने भूमाफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

वृद्धाच्या हत्येप्रकरणी नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिकासह 20 जणांवर मोक्का

author img

By

Published : May 9, 2021, 10:32 AM IST

नाशिक : नाशिकच्या आनंदवली खून प्रकरणात भूमाफिया टोळी उघडकीस आली असून या टोळीचा मास्टरमाइंड रम्मी राजपूत, सचिन मंडलिक, बांधकाम व्यवसायिक बाळासाहेब कोल्हे याच्यासह 20 जणांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. राज्यात भूमाफियांविरोधात ही पहिलीच कारवाई असल्याने भूमाफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

वृद्धाच्या हत्येप्रकरणी नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिकासह 20 जणांवर मोक्का
20 जणांच्या टोळीवर कारवाईनाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल मंडलिक यांच्या फिर्यादीनुसार वडील रमेश मंडलिक (वय 70) यांचा खून करण्यासाठी संशयित सचिन मंडलिक आणि त्याचे साथीदार अक्षय मंडलिक, भूषण मोटकरी, सोमनाथ मंडलिक, दत्तात्रय मंडलिक, नितीन खैरे, काशीनाथ मंडलिक, आबासाहेब भडांगे, भगवान चांगले, बाळासाहेब कोल्हे, गणेश काळे, सागर ठाकरे, अनिल वराडे, जगदीश मंडलिक, रम्मी राजपूत, मुक्ता मोटकरी यांनी कट रचून होमगार्ड गणेश काळे आणि बाबासाहेब भडांगे यांचा भाचा भगवान चांगले यांना तीस लाख आणि दहा गुंठे जमीन देण्याची सुपारी दिली. या दोघांनी 17 फेब्रुवारी रोजी रमेश मंडलिक हे शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता दोघांनी धारदार शस्त्राने गळा चिरून त्यांचा खून केला, या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात संशयितयांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या टोळीमध्ये गोकुळ आव्हाड, अमोल कालेकर, सिद्धेश्वर अंडे, दत्तात्रेय सुरवाडे, नारायण बेंडकुळे यांचीही या भूमाफियामध्ये कनेक्शन उघडकीस आले आहे.गरीब भूधारकांना दिलासाभूमाफिया टोळीवर प्रथमच मोक्कान्वये कारवाई करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक आणि गरीब भूधारकांना दिलासा मिळणार आहे. संघटित गुन्हेगारी, टोळी निर्माण करून गरिबांच्या जमिनी हडप करणाऱ्या भूमाफियांना वरील कारवाईने जरब निर्माण होणार आहे. राज्यात प्रथमच भूमाफियांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.