ETV Bharat / city

नाशिक : ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर अत्याचार, आरोपी गजाआड

नाशिक सिडको परिसरात असलेल्या पवन नगर येथे ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या एका महिलेवर आरोपी नितीन पवारने अत्याचार केल्याचे पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. यानंतर फरार झालेल्या आरोपीला काही तासात पकडण्यास पोलिसांना यश आले आहे.

Nashik crime
आरोपी गजाआड
author img

By

Published : Sep 30, 2021, 1:05 PM IST

नाशिक - सराईत गुंडाने चाकूचा धाक दाखवत ब्यूटी पार्लर व्यावसायिक महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार सिडको परिसरात घडला होता. या घटनेनंतर संशयित आरोपी नितीन पवार फरार झाला होता. मात्र, अंबड पोलिसांनी अवघ्या काही तासात संशयित पवार यांना अटक केली आहे.

नाशिक शहरातील सिडको परिसरात असलेल्या पवन नगर येथे ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या एका महिलेवर संशयित नितीन पवार याने दुकानात प्रवेश केला. पीडित महिलेला चाकूचा धाक दाखवून दुकानाचे शटर लावले. तसेच महिलेच्या तोंडात बोळा कोंबून दोन तास तिच्यावर अत्याचार केल्याचे पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेनंतर संशयित फरार झाला होता. पीडित महिला ही विधवा असून याबाबत अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात होता. पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.

असा रचला सापळा

आरोपी हा जुने सीबीएस परिसरात लपून बसल्याची माहिती पोलीसांना गुप्त बातमीदाराद्वारे मिळाली. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या टीमने सीबीएस परिसरातून आरोपी नितीन पवार याला अटक केली. 2013 मध्ये दोन महिलांवर धारधार चाकूने वार करत खून केल्या प्रकरणी आरोपी नितीन पवार याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. तो पेरॉल वरून बाहेर आल्यावर ते कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

तडीपार गुन्हेगारांचे शहरात वास्तव्य

नाशिक शहरात तडीपार केलेल्या गुन्हेगारांचे वास्तव्य वाढले आहे. काही दिवसांपूर्वी मखमलाबाद भागातून एका तडीपार गुन्हेगाराकडून गावठी पिस्तुलासह अटक करण्यात आली होती. गणेशोत्सवात पोलिसांनी सहा गुन्हेगारांना अटक केली आहे. बऱ्याच चोऱ्या, घरफोड्याच्या गुन्ह्यामध्ये तडीपार गुन्ह्याचा सहभाग दिसून आला आहे.
हेही वाचा - पंचनामे होत राहतील, त्याआधी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा; राज ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.