नाशिक - शहरात एक मुस्लिम कुटुंबातील मुलगा घरगुती गणेश मूर्तींना फेटा बांधत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. विशेष म्हणजे या मुलांच्या हातून फेटा बांधून घेण्यात कुणालाही संकोच वाटत नाही.
गणेश मूर्ती विक्री केंद्रांवर जाऊन हा गणेश मूर्तींना फेटा बांधण्याच करतो काम
नाशिकमधील गुलाम मेहबूब सय्यद हा तरूण गणेश मूर्तीला मनोभावे फेटा बाधत आहे. नाशिक शहरातील वेगेवेगळ्या गणेश मूर्ती विक्री केंद्रांवर जाऊन हा गणेश मूर्तींना फेटा बांधण्याच काम करतो. गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा उत्सव समजला जातो. अनेक लोक हिंदू रितिरिवाजाने घरा-घरात गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत असता मात्र अस असलं तरी या मुस्लिम मुलाच्या हातून फेटा बांधून घेण्यात कुणालाही संकोच वाटत नाही.
अर्ध्या फुटापासून ते 10 फुटांपर्यंतच्या मूर्तींना त्याने आकर्षक फेटे बांधले
गणेशोत्सव हा हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असले तरी या उत्सवातून सर्वधर्मीयांना रोजगार मिळतो. नाशिकमध्ये घरगुती गणेश स्थापनेसाठी नेल्या जाणाऱ्या मूर्तींनाही मुस्लिम मुलाच्या हातून फेटा बांधून घेण्यात कुणालाही गैर वाटत नाही. गेल्या तीन वर्षांपासून गुलाम हा मूर्तींना फेटा बांधायचे काम करत आहे. अर्ध्या फुटांपासून ते 10 फुटांपर्यंतच्या मूर्तींना त्याने आकर्षक फेटे बांधले आहेत. धार्मिक सलोखा निर्माण करणाऱ्या अशा अनेक घटना महराष्ट्राच पुरोगामीत्व अबाधित ठेवत आहेत.
हेही वाचा - लोकांना फसवणाऱ्या ज्योतिषाचा अंनिस'कडून भांडाफोड, पोलिसांनी घेतले ताब्यात