ETV Bharat / city

नाशिक जिल्ह्यात 6 महिन्यात कोरोनामुळे 922 जणांचा मृत्यू - nashik latest news

नाशिक जिल्ह्यात 6 महिन्यात कोरोना मुळे 922 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सद्य परिस्थितीत 36 हजार पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.

नाशिक
नाशिक
author img

By

Published : Apr 10, 2021, 6:03 PM IST

नाशिक - जिल्ह्यात 6 महिन्यात कोरोना मुळे 922 जणांचा मृत्यू झाला असून दिवसेंदिवस कोरोना बधितांचा आकडा वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात रोज 4 ते 5 हजार नवीन रुग्णांची भर पडत असून मृत्यूचा आकडा देखील वाढत आहे. जिल्ह्यात सद्य परिस्थितीत 36 हजार पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.

30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन

मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ नाशिकमध्ये देखील कोरोनाचा उद्रेक वाढला असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने 30 एप्रिल पर्यंत मिनी लॉकडाऊन जारी केला असून नाशिकमध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत आहे. मात्र, या निर्बंधामधून उद्योग, वाहतूक यांना सूट देण्यात आली आहे. शनिवार आणि रविवार विकेंड ला कोरोना नियम अधिक कडक करण्यात आले असून. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे.

नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या 35 लाख -

नाशिक शहराची लोकसंख्या जवळपास 15 ते 18 लाख तसेच नाशिक जिल्ह्याचे 15 तालुके मिळून जवळपास 15 लाख लोकसंख्या आहे.

नाशिक शहरात 1293 प्रतिबंधीत क्षेत्र -

नाशिक शहरात कोरोना बधितांची संख्या वाढत असून आतापर्यंत 1 लाख 37 हजार 392 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1 लाख 14 हजार 962 सद्य परिस्थितीत नाशिक शहरात आहेत. 21 हजार 200 रुग्ण उपचार घेत असून आता पर्यंत 1230 जणांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक शहरात 135 कोविड रूग्णालय -

नाशिक शहरातील सरकारी आणि खासगी अशा 135 ठिकाणी कोरोना बधितांवर उपचार सुरू आहेत. यात एकूण 5 हजार 187 बेडची सुविधा करण्यात आली आहे. 2151 ऑक्सीजन बेड, 570 व्हेंटिलेटर बेड, 728 आयसीयू बेडची सुविधा करण्यात आली आहे. आरोग्य विभागामार्फत सर्व सुविधा सुरळीत सुरू असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, कुठल्याच रूग्णालयामध्ये ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती असून बेड मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची परवड होत असल्याची सर्वत्र चर्चा आहे.

जीवनावश्यक सेवा सुरू -

नाशिक जिल्ह्यात कोरोना मुळे मिनी लॉक डाऊन करण्यात आला आहे. यातून उद्योग, वैद्यकीय सुविधा असलेली रुग्णालय, मेडिकल, सिटी स्कॅन सेंटर सुरू ठेवण्यात आले आहेत. किराणा दुकान,दूध,भाजीपाला, फळ विक्रेते यांना सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली असून रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

अंत्यसंस्कारसाठी मृतदेहांची संख्या वाढली -

नाशिक जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून रोज कोरोना मुळे 25 ते 30 जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत कर्मचाऱ्यावर ताण वाढला आहे. काही वेळा मृतदेह वाढल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी बेड मिळत नसल्याने जमिनीवर अंत्यसंस्कार केले जात आहेत.

रेमडिसिव्हर चा तुटवडा -

कोरोना बाधित रुग्णाला उपचारासाठी लागणाऱ्या रेमडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांच्या नातेवाईकांची रेमडिसिव्हर मिळण्यासाठी फार्मा स्टोर बाहेर रीघ लागली आहे. रेमडिसिव्हरचा काळाबाजार होत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे असून काही ठिकाणी नातेवाईकांनी सरकार विरोधात आंदोलन सुरू केले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ८३ हजार १५१ रुग्ण कोरोनामुक्त -

सद्यस्थितीत ३६ हजार २३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार १५१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३६ हजार २३५ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ६२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण -

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक ८१२, चांदवड १ हजार ११७, सिन्नर १ हजार ७७, दिंडोरी ८२०, निफाड २ हजार ३५८, देवळा १ हजार २८८, नांदगांव ९१४, येवला ३०८, त्र्यंबकेश्वर ३८६, सुरगाणा २१३, पेठ ९३, कळवण ५८३, बागलाण १ हजार २२९, इगतपुरी ५०४, मालेगांव ग्रामीण ९१३ असे एकूण १२ हजार ६१५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २१ हजार २००, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ६० तर जिल्ह्याबाहेरील ३६० असे एकूण ३६ हजार २३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख २२ हजार ०६ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी -

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मध्ये ८०.९५ टक्के, नाशिक शहरात ८३.६७ टक्के, मालेगाव मध्ये ७६.२९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८५.४६ टक्के आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.५० इतके आहे.

मृत्यू -

नाशिक ग्रामीण १ हजार ८७, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार २३०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २१८ व जिल्हा बाहेरील ८५ अशा एकूण २ हजार ६२० रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.