नाशिक - मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आज तीन वर्षे पूर्ण झाली. तीन वर्षानंतर नोटबंदीचा आजही परिणाम जाणवतोय. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
नोटबंदीनंतर काळा पैसा बाहेर येईल, ह्या उद्देशाने केलेली नोटबंदी सपशेल फसल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. आजही उद्योग, व्यवसायांमध्ये नोटबंदीचा परिणाम जाणवत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. तसेच, नोटबंदीमुळे इ. बँकिंग वाढल्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचेही नागरिकांनी म्हटले आहे. नोटबंदीबाबत नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत.