नाशिक - जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण साठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून,2 धरणं 100 टक्के तर 6 धरणं 50 टक्के भरली आहेत. तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण 68 टक्के भरले.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली होती, मात्र मागील चार दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात मध्यम स्वरूपात हजेरी लावल्याने जिल्ह्यातील छोट्या,मोठ्या धरणातील पाणी साठ्यात समाधानकाराक वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील 24 धारणां पैकी 2 धरणं ही 100% भरली आहेत. भावली धरणापाठोपाठ नांदूरमध्यमेश्वर धरण देखील भरले 100% भरल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसाने चांगलीच हजेरी लावल्याने पाणी साठ्यात वाढ होत आहे. 24 पैकी 6 धरणांचा पाणीसाठा हा 50 टक्क्यांहून अधिक झाला आहे. विशेष म्हणजे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा हा 68 टक्के इतका झाला आहे. मात्र असे असले तरी शहरात पाणी कपात ही कायम आहे. अजून देखील जिल्ह्यात समाधानकाराक पाऊस होण्याची अपेक्षा आहे.
'या' धरणात 50 टक्के हुन अधिक आहे पाणी साठा
गंगापूर धरण-68 टक्के
दारणा धरण-78 टक्के
आळंदी धरण- 52 टक्के
वालदेवी धरणं-86 टक्के
हरणबारी धरणं-52 टक्के
माणिकपुंज 50- टक्के
नाशिक जिल्ह्यातील दोन धरणं 100 टक्के भरली, सहा धरणांचा पाणी साठा 50 टक्क्यांवर - Manikpunj Dam
जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण साठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून,2 धरणं 100 टक्के तर 6 धरणं 50 टक्के भरली आहेत. तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण 68 टक्के भरले.