ETV Bharat / city

नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 12 हजार बालके कोरोनाबाधित

नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांचे प्रमाण अधिक असून यात मागील चार महिन्यात 12 हजार लहान बालकांना कोरोना झाल्याचे समोर आलं आहे.

nashik corona
संग्रहित फोटो
author img

By

Published : May 28, 2021, 6:05 PM IST

Updated : May 28, 2021, 6:47 PM IST

नाशिक - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होतं असला तरी प्रशासनाने तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केली आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांचे प्रमाण अधिक असून यात मागील चार महिन्यात 12 हजार लहान बालकांना कोरोना झाल्याचे समोर आलं आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा हे प्रमाण दुप्पट असल्याचे शासकीय अहवालातून समोर आलं आहे.

माहिती देताना जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ञांकडून व्यक्त केला जात असल्याने प्रशासन देखील सतर्क झाले आहे. नाशिक जिल्ह्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. परंतु पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देखील बालकांना कोरोनाची लागण झाली होती, प्राप्त अहवालानुसार, दुसऱ्या लाटेत म्हणजे 16 फेब्रुवारीपासून आतापर्यंत 0 ते 12 वयोगटातील 12 हजार 282 बालकांना कोरोनाची बाधा झाली. यात 6 हजार 719 मुलं आणि 5 हजार 463 मुलींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 13 ते 25 वर्ष वयोगटातील 43 हजार 745 बाधित झालीं आहेत.

वय । 27 मार्च ते 15 फेब्रुवारी । 16 फेब्रुवारी पासून पुढें

0 ते 12 - 6121 - 12282
13 ते 25 - 17054 - 43745
एकूण - 23175 - 56027

हेही वाचा - अपोलो हॉस्पिटल्समध्ये 'स्पूटनिक व्ही'चे लसीकरण; 1195 रुपये प्रति डोसची किंमत!

बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स

लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता जिल्ह्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला असून नुकताच या पथकाने जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर केला. यात बालकांवर करावे लागणारे उपचार, सुविधा आदी बाबत चर्चा करण्यात आली. तसेच काही सूचनाही करण्यात आल्या आहेत.

लहान मुलांसाठी शंभर बेडचे कोविड सेंटर

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महानगरपालिका अलर्ट झाली असून, नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात 100 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातही लहान मुलांच्या उपचारासाठी विशेष व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका -

ताप, सर्दी, कोरडा खोकला, उलटी होणे, भूक न लागणे, जुलाब होणे, जेवण नीट न जाणे, थकवा जाणवणे, श्वास घेताना अडचण जाणवणे, शरीरावर पुरळ येणे.

गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक बाधा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठीं नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागाने तयारी केली आहे. मात्र, पालकांनी आपल्या बालकांची काळजी घेणं गरजेचं आहे. बालकांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाऊ नये, इतर सदस्यांनी घरात आल्यावर हात स्वच्छ धुवावे, आंघोळ करावी मगच बालकांजवळ जावे, ज्या बालकांना आधीपासूनच हृदय संदर्भात तक्रारी आहेत अशा बालकांची विशेष काळजी घेतली पाहिजे, असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा - 'यास' चक्रीवादळाचा फटका बसेलेल्या राज्यांना 1 हजार कोटींची आर्थिक मदत

Last Updated : May 28, 2021, 6:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.