ETV Bharat / city

Increase Skin Disorders in Nashik : नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ; त्वचा रुग्णांमध्ये 10 ते 12 टक्क्यांनी वाढ

नाशिकमध्ये ( Continuous Rains in Nashik ) गेल्या सहा दिवसांपासून सतत पाऊस ( Raining Incessantly Past Six Days ) सुरू आहे. त्यामुळे साथीचे आजार नाशिकमध्ये वाढले ( Epidemics rising in Nashik )असताना, त्वचा विकाराचे रुग्णसुद्धा वाढले ( Increase Skin Disorders ) आहेत. त्वचा विकाराच्या रुग्णांमध्ये 10 ते 12 टक्क्यांनी वाढ झाली ( Increase Skin Disorders 10 to 12 Percent ) आहे. त्यामुळे डाॅक्टरांनी नागरिकांना स्वच्छ आणि कोरडे कपडे घालण्याचे आवाहन केले आहे. ( Doctors urged to wear clean and dry clothes )

Increase in Skin Disorder Patients
त्वचा विकाराच्या रुग्णांमध्ये वाढ
author img

By

Published : Jul 17, 2022, 7:18 AM IST

Updated : Jul 17, 2022, 8:15 AM IST

नाशिक : नाशिकमध्ये गेल्या सहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू ( Raining Incessantly Past Six Days ) आहे. अशात ओले कपडे परिधान केल्याने 10 ते 12 टक्क्यांनी त्वचाविकाराचे ( Increase Skin Disorders 10 to 12 Percent ) रुग्ण वाढले ( Increase Skin Disorders ) आहे. दमट आणि ओले कपडे घालणे नागरिक जोपर्यंत बंद करीत नाहीत. तोपर्यंत त्वचाविकाराच्या समस्या थांबणार नाहीत, असे डॉ. वृषाली व्यवहारे ( Doctor Vrushali Vyavhare ) यांनी सांगितले आहे. नाशिक महानगरपालिकेत मागील दहा दिवसांत तापसदृश आजाराचे 3000 रुग्णांची नोंद झाली आहे. ( Epidemics rising in Nashik ) ( Doctors urged to wear clean and dry clothes )

डॉक्टर वृषाली व्यवहारे

नाशिकमध्ये साथीचे आजार बळावले : ( Epidemics on the rise in Nashik ) नाशिकमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे साथीचे रोग, तसेच कीटकजन्य आजाराने तोंड वर काढले ( Insect-Borne Diseases on Rise ) आहे. तसेच, पावसाळ्याच्या पाण्याच्या डबक्यांमध्ये निर्माण होणाऱ्या डासांमुळे विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. नाशिकमध्ये आतापर्यंत 49 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. अशात आता नागरिक दमट आणि ओले कपडे परिधान करीत असल्याने त्यांना खरूज, नायटा, त्वचेवर पुरळ येणे, त्वचेवर फोड येणे, गजकर्ण अशा प्रकारच्या त्वचा विकाराच्या तक्रारी वाढल्या आहेत.

साथीच्या आजारात सर्व वयोगटातील रुग्ण : नाशिकमध्ये पावसाची मुसळधार चालू असतानाच आता ह्या आजारांनी डोके वर काढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेत साथीच्या आजारात सर्व वयोगटातील रुग्ण वाढत असल्याची नोंद आहे. हे विकार केवळ मोठ्यांना नाहीत, तर लहानांमध्येदेखील आढळत आहेत. जोपर्यंत नागरिक ओले कपडे अंगावर कायम ठेवणे थांबवत नाही, तोपर्यंत त्वचाविकारांमधील वाढ कायम राहण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेने तातडीने निदान साथीच्या रोगांवर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

नागरिकांमध्ये भीती : सर्वसामान्य नागरिकांच्या मनात त्वचारोगाविषयी अनेक अंधश्रद्धा, गैरसमज, भीती असते. त्याविषयी उघडपणे बोलण्यास ते टाळाटाळ करतात. तसेच पावसाळ्यात अंगावरील कपडे किंवा अंतर्वस्त्रे वाळवण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे आपोआपच त्वचाविकारांना निमंत्रण मिळते. निदान पावसाळ्यात तरी नागरिकांनी याची काळजी घेणे गरजेचं आहे.

त्वचाविकार बुरशीजन्य विकार : ओले कपडे जास्त वेळ परिधान केल्यास अनेकांना त्वचेवर पुरळ उठणे, नखांखालील पेशींना संसर्ग होणे, तोंडात व्रण निर्माण होणे, अंगावर चट्टे येणे, पुरळ, सतत त्वचेची लाही लाही होणे, अशा प्रकारच्या त्वचाविकार बुरशीजन्य विकाराच्या समस्या नागरीकांना भेडसावतात.

डॉक्टरांचा सल्ला घ्या : पावसात कपडे भिजले असल्यास अंग पूर्णपणे पुसून मगच कोरडे कपडे परिधान करावे. अंगावर चट्टे, खाज, पुरळ आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेवरच उपचार केल्यास त्वचाविकार लवकर बरा होतो, असे डॉक्टर वृषाली व्यवहारे यांनी सांगितले आहे. तसेच, परिसर स्वच्छ ठेवणे, घराच्या आजूबाजूच्या परिसरात पाण्याचे डबके साचणार नाही. घाण राहणार नाही याची काळजी घ्यावी.

हेही वाचा : Jagdeep Dhankhar For VP : जगदीप धनखर हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार : भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची घोषणा

Last Updated : Jul 17, 2022, 8:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.