ETV Bharat / city

नागपूर : नारायण राणे विरोधात युवा सेनेचे कोंबड्यांसह आंदोलन - नागपूर नारायण राणे विरोधात युवा सेनेचे आंदोलन

नागपूरच्या महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी नारायण राणे यांना शिव्यांची लाखोळी वाहिली. एवढंच नाही, तर संतप्त युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी राणे कोंबडीचोर असल्याच्या घोषणा देत कोंबड्यांसाह आंदोलन केले.

yuvasena agitation
yuvasena agitation
author img

By

Published : Aug 24, 2021, 8:00 PM IST

नागपूर - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या बेताल वादग्रस्त वक्त्यावरून शिवसेनेकडून सुरू झालेला राडा नागपूरातदेखील बघायला मिळाला. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी नारायण राणे विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. नागपूरच्या महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी नारायण राणे यांना शिव्यांची लाखोळी वाहिली. एवढंच नाही, तर संतप्त युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी राणे कोंबडीचोर असल्याच्या घोषणा देत कोंबड्यांसाह आंदोलन केले.

युवा सेनेचे कोंबड्यांसह आंदोलन

कोंबडी घेऊन केलं आंदोलन -

शिवसेना आणि भाजपामधला सत्ता संघर्ष आधीच विकोपाला गेला असताना काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात बेताल वक्तव्य केल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. मुंबईमध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपसात भीडल्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे कोंबडी चोर असल्याच्या घोषणा देत चक्क कोंबड्या घेऊन आंदोलन केले. नारायण राणे यांनी नागपुरात पाय ठेऊन दाखवावे, युवा सेनेचा कार्यकर्ता त्यांना पुरून उरेल, अशी धमकीदेखील कार्यकर्त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना स्वतःचा स्वाभिमान विकून मंत्रिपद मिळाले आहे. केंद्रीय सरकारने राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

हेही वाच - जाणून घ्या, नारायण राणे संदर्भात आज दिवसभरात नेमके काय घडले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.