ETV Bharat / city

नागपुरात दारुच्या वादातून तरुणाची हत्या, आरोपीला अटक - नागपुरात दारुच्या वादातून तरुणाची हत्या

नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंट झेविअर्स शाळे जवळ मृतक दिनेश आणि अतुल हे दोघे मित्र दारू पीत बसले होते. दारू पीत असताना दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की आरोपी अतुल हेमराज शिवणकर याने दिनेश राजापुरेच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याला जागीच ठार केले.

तरुणाची हत्या
तरुणाची हत्या
author img

By

Published : Nov 19, 2021, 5:32 AM IST

नागपूर - नागपूर शहरातील नंदनवन पोलीस स्टेशन (Nandanvan Police Station) हद्दीत एकाची हत्या झाली आहे. दिनेश राजापुरे असे हत्या (Murder of a youth) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी मृतकाचा मित्र अतुल शिवणकर याला अटक केली आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंट झेविअर्स शाळे जवळ मृतक दिनेश आणि अतुल हे दोघे मित्र दारू पीत बसले होते. दारू पीत असताना दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की आरोपी अतुल हेमराज शिवणकर याने दिनेश राजापुरेच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याला जागीच ठार केले. मृतक दिनेश राजापुरे आणि आरोपी हेमराज शिवणकर दोघे एकाच परिसरात राहत होते आणि दोघेही एकत्रच पेंटिंगचे काम करत होते.

दारुच्या वादातून हत्या

दिनेश आणि अतुल हे दोघेही पेंटिंगचे काम करत होते. काल देखील त्यांना पेंटिंगच्या कामातून एक हजार रुपये मिळाले होते. त्या पैशातून त्यांनी दारू विकत घेतली. त्यानंतर सेंट झेविअर्स शाळे जवळील निर्जनस्थळी दारू पिण्याच्या कार्यक्रम सुरू झाला. दारू पीत बसले असता या दोघांमध्ये वाद झाला मृतक दिनेश राजापुरे याने आरोपीला शिव्या दिल्या असता आरोपी अतुलला राग आल्याने त्याने जवळचा दगड दिनेश राजापूरे यांच्या डोक्यावर दगड मारून निघून गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपीला पोलीसानी अटक केली आहे.

हेही वाचा - धक्कादायक! दुकानदाराचा अल्पवयीन नोकरावर अनैसर्गिक अत्याचार; नराधम मालकाला बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.