ETV Bharat / city

जागतिक मूत्रपिंड दिवस विशेष : मधुमेह, उच्च रक्तदाबाचा किडनीवर पडतो ताण - Kidney decease news

महाराष्ट्र राज्यात साधारण 5507 जण तर विदर्भात पूर्व 306 जण हे किडनीसाठी प्रतीक्षा यादीत आहे. ही गंभीरता लक्षात घेता किडनीच्या आजारापासून प्रतिबंध झाल्यास उपचारपद्धती आणि किडनी प्रत्यारोपणासंबंधित अनेक प्रश्न आणि त्याची उत्तरे या खास वृतांतून...

World Kidney Day
World Kidney Day
author img

By

Published : Mar 11, 2021, 5:16 PM IST

Updated : Mar 11, 2021, 7:48 PM IST

नागपूर - आजच्या धकाधकीच्या काळात बदलते जीवनमान आणि खानपान याचा शरीरावर गंभीर परिणाम होत चाललेला आहे. यात आजच्या आघाडीला मधुमेह, उच्च रक्तदाब या रुग्णाची संख्या वाढत आहे. पण याच आजारांचा परिणाम मानवी शरीरातील महत्त्वाचा अंग असलेल्या किडनीवर पडू लागला आहे. याच संदर्भात जाणून घेऊयात जागतिक किडनी दिनानिमित्ताने... महाराष्ट्र राज्यात साधारण 5507 जण तर विदर्भात पूर्व 306 जण हे किडनीसाठी प्रतीक्षा यादीत आहे. ही गंभीरता लक्षात घेता किडनीच्या आजारापासून प्रतिबंध झाल्यास उपचारपद्धती आणि किडनी प्रत्यारोपणासंबंधित अनेक प्रश्न आणि त्याची उत्तरे या खास वृतांतून...

चुकीच्या औषधाचे सेवनही कारणीभूत

किडनी रुग्णाचा विचार केल्यास 60 ते 70 टक्के मधुमेह आणि उच्च रक्तदाब रुग्णांना किडनी आजाराशी लढावे लागत असल्याचे पुढे आले आहे. या दोन आजारासह कमी वयात हायपरटेन्शन आणि सर्वाधिक मधुमेहामुळे किडनी निकामी होण्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. यासह चुकीच्या औषधाचे सेवन कधीकाळी स्वतःच्या शरीरातील आजाराच्या लक्षणांना दुर्लक्षित केल्याने भविष्यातील गंभीर आजारांना समोर जावे लागत असल्याचे वैदकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

यंदाची थीम 'लिविंग वेल विथ किडनी डिसीज'

जागतिक किडनी दिवसाला किडनी रोगाबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. जागतिक स्तरावर एक थीम ठरवली जाते. 2020मध्ये 'किडनी हेल्थ फॉर एव्हरीवन एव्हरीव्हेअर'पासून 2021मध्ये 'लिविंग वेल विथ किडनी डिसीज' ही थीम ठेवण्यात आली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात जनजगृती करून आजाराविषयी लोकांमध्ये किडनी ही प्रत्येकवेळी बदलण्याची गरज पडत नसून अगदी सुरुवातीच्या काळात यात तपासणी करू उपचार घेऊन रुग्ण बरे होत असल्याचे माहिती पोहोचवण्याचे काम केले जात आहे.

किडनीचे आजार दोन स्वरूपाचे

किडनीच्या आजाराला उपचाराने दुरुस्त केले जाऊ शकते. यामध्ये योग्य काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. मधुमेहामुळे साधारण 10 वर्ष किमान किडनीवर परिणाम होण्यास लागते. यामुळे दर सहा महिन्याने काळजी घेत तपासण्या करत राहिल्यास किडनीच्या गंभीर आजारांना प्रतिबंध करता येऊ शकतो तसेच उपचार घेऊन दुरुस्त करता येऊ शकतो. यात दुसरा प्रकार क्रॉनिक किडनी डिसीज... याला वैद्यकीय भाषेत सिकेडी (CKD) असेही म्हणतात. यावर कायमस्वरूपी उपचाराची गरज असते. यात किडनीच्या आजारात पाच स्टेजेस असतात. यात शेवटच्या स्टेजमध्ये असल्यास डायलेसीसने उपचार शक्य नसल्यास किडनी प्रत्यारोपणाचा अंतिम पर्याय पुढे येतो.

कोण करू शकतो किडनी डोनेट?

किडनी प्रत्यारोपण दोन पद्धतीने साधारण केले जाते. यात एकतर कुटुंबातील डोनर चालतो. यामध्ये आई, वडील बहीण भाऊ, पती-पत्नी, मुलगा मुलगी आणि दोन्ही बाजूचे आजी-आजोबा हेच लोक कुटुंबातील व्यक्तीला किडनी डोनेट करू शकतात. यात कुटुंबामध्ये डोनर असल्यास समितीकडून योग्य तपासणी आणि कॅमेराबद्ध मुलाखती घेऊन कुठला दबाव तर नाही हे तपासून निर्णय घेतला जातो. तसेच ब्रेन डेड रुग्णांमध्ये झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटीकडून प्रतीक्षा यादी तपासून मृत्यूनंतर डोनर असल्यास कॅडेव्हरीक ट्रान्सप्लांट केले जाते. ही शासकीय समिती असून यात काटेकोरपणे नियमाचे पालन करून केले जाते.

डोनर नसल्याने विदर्भात 306 जण किडनीच्या प्रतीक्षा यादीत

विदर्भात साधारण 306 रुग्ण किडनीच्या प्रतीक्षा यादीत आहेत. ज्यांच्याकडे लाइव्ह डोनर नाही. तेच महाराष्ट्रात नोंदणी असलेले 5500 रुग्ण आहेत. प्रत्यक्षात यापेक्षा अधिक रुग्ण आहेत, ज्यांची किडनी कायस्वरूपी निकामी झाली आहे.

शासकीय योजनेत मोफत तर खाजगीत मोजावे लागते पैसे

खासगी रुग्णालयात आठवड्यातून दोनदा डायलेसीस करावे लागत असून यात 2 हजारांपासून 5 हजारांपर्यंत खर्च येतो. तेच किडनी प्रत्यारोपणाला साधारण 6 लाखांपासून 15 लाखांपर्यंत खासगी रुग्णालयातील सुविधा आणि त्याचा उपचार खर्च कमी अधिक असू शकतो.

किडनी ट्रान्सप्लांट नंतर महिन्याकाठी खर्च न झेपणारा

किडनी ट्रान्सप्लांटनंतर वर्षभर शासकीय रुग्णालयातून उपचार घेत असल्यास मोफत औषधोपचार मिळतो. पण त्यांनंतर आयुष्य कठीण होऊन जाते. कारण महिन्याला औषधांचा खर्च हा 6 ते 8 काही वेळेस 10 हजारांपर्यंत असतो आणि हा खर्च रुग्णाच्या मृत्यूपर्यंत लागू असतो. यामुळे बरेचदा आर्थिकदृष्ट्या परवडत नसताना अडचणीतून समोर जावे लागते.

Last Updated : Mar 11, 2021, 7:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.