ETV Bharat / city

Why Shiv Sena Did Not Grow Vidarbha : विदर्भात शिवसेनाची वाढ आणि विस्तार का झाला नाही, हे आहे कारण - विदर्भ

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून घडलेली शिवसेना. मुंबई, पुणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात कायम मजबूत स्थितीत दिसते. मात्र, तीच शिवसेना महाराष्ट्राचा प्रमुख प्रदेश असलेल्या विदर्भात मात्र, सर्वात कमजोर पक्ष ठरला ( vidarbha shiv sena ) आहे. कधी काळी चार खासदार देणाऱ्या विदर्भाने शिवसेनेला का नाकारले हा महत्वाच्या प्रश्न आहे. या करीता शिवसेनेचे आजी आणि माजी नेत्यांचे यावर काय म्हणणे आहे हे जाणून घेणार ( vidarbha shiv sena latest news ) आहोत, सोबतचे राजकीय विश्लेषकांना काय वाटते हे सुद्धा जाणून घेणार आहोत. ( Why Shiv Sena Did Not Grow )

Why Shiv Sena Did Not Grow Vidarbha
विदर्भात शिवसेनाची वाढ आणि विस्तार का झाला नाही
author img

By

Published : Jun 27, 2022, 3:59 PM IST

नागपूर - शिवसेना हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणाचा अविभाज्य घटक आणि अतिशय महत्वाचा राजकीय पक्ष आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने बंडखोरीचे हऱ्यार उपसताचं शिवसेनेचे अस्तित्वचे धोक्यात आले आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून घडलेली शिवसेना. मुंबई, पुणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात कायम मजबूत स्थितीत दिसते. मात्र, तीच शिवसेना महाराष्ट्राचा प्रमुख प्रदेश असलेल्या विदर्भात मात्र, सर्वात कमजोर पक्ष ठरला ( vidarbha shiv sena ) आहे. कधी काळी चार खासदार देणाऱ्या विदर्भाने शिवसेनेला का नाकारले हा महत्वाच्या प्रश्न आहे. या करीता शिवसेनेचे आजी आणि माजी नेत्यांचे यावर काय म्हणणे आहे हे जाणून घेणार ( vidarbha shiv sena latest news ) आहोत, सोबतचे राजकीय विश्लेषकांना काय वाटते हे सुद्धा जाणून घेणार आहोत. ( Why Shiv Sena Did Not Grow Vidarbha )

प्रतिक्रिया
  • नेते, कार्यकर्ते सांभाळण्यात शिवसेना अपयशी - विकास वैद्य

शिवसेनेचे जितके प्रेम मुंबई, पुणे, नाशिक आणि कोकणावर केले आहे. त्या तुलनेत विदर्भाकडे कायम दुर्लक्ष केल्यामुळे शिवसेनेला आज विदर्भात स्वतःचे अस्तित्व शोधावे लागत असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विकास वैद्य यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेत हा विश्वासचे नव्हता की ते विदर्भात कधीही स्वबळावर निवडून येऊ शकतात,त्यांना भाजपच्या कुबड्याचं घेतल्या, मुळात त्यांनी शिवसेना विदर्भात उभी करण्याचा प्रयत्नचं केला नसल्याचं निरीक्षण विकास वैद्य यांनी नोंदवलं आहे. कधी काळी विदर्भात शिवसेनेची स्थिती फार वाईट नव्हती. इथे चार खासदार आणि अनेक आमदार शिवसेनेकडे होते. मात्र, शिवसेना आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सांभाळताचे आले नाहीत, त्यामुळे अनेक नेते शिवसेनेला सोडून इतर पक्षात गेले आहेत. त्यामुळे आज शिवसेना विदर्भात फार प्रभावी दिसत नसल्याचे मत विकास वैद्य यांनी व्यक्त केले आहे.

  • बाळासाहेबांनीच विदर्भ केला होता भाजपच्या हवाली - कुमेरिया

हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने बाळासाहेबांनीचं विदर्भ हा भाजपच्या हवाली केला होता, अशी प्रतिक्रिया नागपूर महानगर प्रमुख आणि एकमेव नगरसेवक असलेल्या किशोर कुमेरिया यांनी दिली आहे. विदर्भात हिंदूत्व पसरवताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षाला घरोघरी पोहोचवले. त्यावेळी शिवसेनेच्या नेतृत्वाचे मात्र विदर्भाकडे दुर्लक्ष झाले असल्याचे मत किशोर कुमेरिया यांनी व्यक्त केले आहे. महानगरपालिकेत ही भाजपने शिवसेनेला वाढण्याची आणि विस्तार होण्याची संधी दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

  • नेत्यांना विदर्भाचे गांभीर्य नाही - ज्ञानेश वाकुडकर

शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी कधीही विदर्भाला गांभीर्याने घेतलेले नाही. राजकारणात सौदेबाजी आणि जोडतोड करण्यासाठीच विदर्भाचा उपयोग झाला, असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख ज्ञानेश वाकुडकर यांनी केला आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुद्धा विदर्भाला गांभीर्याने घेत नसल्याचे ते म्हणाले आहेत.

ठाकरे कुटुंबाचे विदर्भासोबत असलेले नाते - विदर्भासोबत ठाकरे घराण्याचे एक नाते आहे. हे फार कमी लोकांना माहीत असेल. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा हे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आजोळ आहे. परतवाड्यातील किराडवाड्यात प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांची पत्नी रमाबाई आणि बाळासाहेब ठाकरे हे वास्तव्यास होते. 2004 साली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी आवर्जून परतवाड्याला जाऊन त्या वाड्याला भेट दिली होती. एवढेच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील या वाड्यात जाऊन आले आहेत.

हेही वाचा - नोटीस बजावलेल्या बंडखोर आमदारांना मोठा दिलासा : 12 जुलैच्या संध्याकाळपर्यंत लेखी उत्तर देण्याची मुभा - सर्वोच्च न्यायालय

हेही वाचा - Sanjay Raut challenged: ईडीच्या समन्स नंतर संजय राऊतांचे आव्हान; म्हणाले मला अटक करा

हेही वाचा - आलिया भट्टने दिली 'गुड न्यूज', "कुणी तरी येणार येणार गं!"

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.