नागपूर - राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी हायड्रोजन फोडत नागपूरचे कुख्यात गुंड असलेले मप्रकाश उर्फ मुन्ना यादव हे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या जवळचे आहे. मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी कुख्यात गुंड म्हणून असलेले यादव यांना बांधकाम कामगार महामंडळाचे अध्यक्षपद दिले होते असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. मात्र हे मुन्ना यादव नेमके कोण आहेत हे जाणून घेऊ या विशेष वृत्तातून...
मलिकांनी घेतले होते यादवचे नाव -
ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव हे नागपुरात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघात राहात असून भाजपा समर्थक आणि उजवा हात म्हणून ओळखले जातात. ते भाजपा पक्षात जवळपास 25 वर्षांपासून आहेत असेही सांगतात. पण अचानक राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करताना त्यांनी कुख्यात गुंड म्हणून मुन्ना यादव यांचे नाव पत्रकार परिषदेत केले.
मुन्ना यादव नगरसेवक -
मुन्ना यादव हे देवेंद्र फडणवीस यांच्य विधानसभा मतदार संघातील दक्षिण पश्चिममध्ये येणाऱ्या चुनाभट्टी परिसरातून नगरसेवक म्हणून निवडणून आलेले आहेत. सध्या मुन्ना यादव यांनी पत्नी ही नगरसेविका आहे.
फडणवीसांनी केली होती बांधकाम कल्याण मंडळावर नियुक्ती -
2014 मध्ये भाजपाचे सरकार आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मुन्ना यादव यांची महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. हाच धागा धरून राष्ट्रवादीचे नेते नावब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.
धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल -
एक ऑडिओ क्लिप मार्च 2016मध्ये समोर आली. त्यामध्ये मुन्ना यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रोशन तेलरांधे नामक युवकाला धमकी देत खंडणीची मागणी केली होती. हेच क्लिप व्हायरल झाल्याने त्याचे नाव चर्चेत आले. त्यानंतर दोन महिन्याने म्हणजेच 2016 मध्येच जुलै महिन्यात मुन्ना यादव यांचा लहान भावाने कामावर असलेल्या एका कामगाराला जबर मारहाण केली होती. प्रकरण पोलिसात गेले आणि गुन्हा सुद्धा दाखल झाला होता.
घरगुती वादात गुन्हा दाखल -
नोव्हेंबर 2017च्या दिवाळीमध्ये मुन्ना यादव आणि त्यांचा मुलांचा यादव कुटुंबातीलच अंतर्गत वादाचे स्वरूप वाढले होते. चुलत्यांसोबत भांडण झाले. एक भाऊबीजेच्या दिवशीच समोरासमोर गंभीर स्वरूपात दुखापत झाली. याच जीवघेणा हल्ला पाहता मुन्ना यादव यांच्या विरोधात 307 म्हणजेच हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा पोलिसात नोंदवल्या गेला होता. यामध्ये तब्बल 4 महिने लोटल्यानंतर मार्च 2018 मध्ये आरोपपत्र दाखल केले. यात उच्च न्यायालयात हे प्रकरण गेले असताना 307 ची कलम वगळून गंभीर स्वरूपाची मारहाण म्हणत कलम 326 अंतर्गत नोंद घेतल्याने मुन्ना यादव यांना दिलासा मिळाला होता.
हेही वाचा - कोण आहेत नवाब मलिक..?, जाणून घ्या त्यांचा व्यवसायिक ते राजकारणापर्यंतचा प्रवास
हेही वाचा - वरळीत 200 कोटींचा फ्लॅट कुणाचा आहे? अमृता फडणवीसांच्या टीकेला मलिकांचे उत्तर