ETV Bharat / city

They forgot Ram Rajya - Togadia : रामाच्या नावावर सत्तेत आलेले रामराज्य विसरले- तोगडिया

रामाच्या नावाचे राजकारण केल्यानंतर (In the name of rama) केंद्रात सत्ता उपभोगत असलेले रामराज्य देण्याचे आश्वासन (Promise of ram rajya ) विसरले आहेत अशी टीका प्रवीण तोगडीया (Pravin Togdiya ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra modi) नाव न घेता केली आहे. अयोध्येत राम मंदिर (Ram Mandir in Ayodhya) होत आहे ही स्वागतार्ह बाब आहे,पण भारताला अमेरिका बनवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय विश्व हिंदु परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी केला आहे.

PRAVIN TOGADIYA
प्रवीण तोगडिया
author img

By

Published : Dec 6, 2021, 4:08 PM IST

नागपूर: आम्हाला भारतात रामराज्य हवे आहे. आर्थिक विकासाच्या नावाखाली हिंदुंचा बळी दिला जात आहे. मुठभर भांडवलशहांच्या हातात संपत्ती एकवटली जात आहे. तर गरीब आणखी गरीब हाेत आहे. बेराेजगारी वाढत आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी चुकीचा मार्ग निवडला आहे. रामराज्यात हे अपेक्षित नव्हते, अशी टीका प्रवीण तोगडीया यांनी केली आहे.

हिंदूंच्या लोकसंख्येत असंतुलन
भारतीय लोकसंख्येत असंतुलन होत चालले आहे. विशेषत: हिंदुंच्या लोकसंख्येत हे असंतुलन प्रकर्षाने जाणवते. विविध धर्मांतील लोकांचा जन्मदर देखील वेगवेगळा आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारने दोनपेक्षा अधिक मुले जन्माला घालण्यावर बंदी आणणारा कायदा आणवा अशी मागणीही तोगडीया यांनी केली.

तर भारत इस्लामिक स्टेट
केंद्र सरकारने प्रकाशित केलेल्या जन्मदर वृद्धी अहवालातून हिंदुंचा जन्मदर २ टक्क्यांवर स्थिरावला आहे. असेच सुरू राहिले तर १४० कोटींवरून हिंदुंची लोकसंख्या १०० कोटींवर यायला वेळ लागणार नाही, मुस्लिमांचा जन्मदर २.५० टक्के असून याच वेगाने त्यांची लोकसंख्या वाढत राहिली तर भारत इस्लामिक स्टेट व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा तोगडीयांनी दिला.

प्रवीण तोगडियांची मोदींवर टीका
यांना भारतरत्न द्यावेशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस तसेच महंत अवैद्यनाथ यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान व्हायला हवा. कारण अगदी सुरूवातीच्या काळात राम मंदिरासाठी कोणीही पुढे येऊन जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. अशा काळात या चौघांनी हिंदु जनजागरण करीत अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी वातावरण निर्मिती केली असेही तोगडीया म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.