नागपूर - नागपूरसह संपूर्ण विदर्भाला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कालपासून आकाशात काळेभोर ढग दाटून आल्याने तापमानात घट झालेली आहे. तर आज सकाळी नागपूर आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची नोंद झाली आहे.
![पावसाचा अंदाज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ngp-02-rain-alert-7204462_17022022105557_1702f_1645075557_47.jpg)
गेल्या काही दिवसांपूर्वी तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. उन्हाळ्याची चाहूल लागताच पुन्हा वातावरणात बदल झाला आहे. आज सकाळी विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नागपूरसह विदर्भातील जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.