नागपूर - शहरातील रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जाणाऱ्या गंगाजमुना परिसरातील एका जीर्ण इमारतीची भिंत कोसळल्याची घटना रात्री घडली. या घटनेत 4 महिला जखमी झाल्या असून त्यांना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन दिवसांपासून नागपूर शहरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे या इमारतीची भिंत कोसळली असल्याची माहिती मिळत आहे. पाऊस सुरू असल्याने गंगा जमुना परिसरात फारसी वर्दळ नव्हती. यावेळी अचानक इमारतीची एक भिंत कोसळी. या अपघातात 4 महिला जखमी झाल्या आहे. महिलांचा ओरडण्याचा आवाज आल्याने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी त्यांना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.