ETV Bharat / city

Navratri 2022 : गरबा उत्सवात फक्त हिंदूंनांच प्रवेश द्या, विश्व हिंदू परिषदेची मागणी

नागपूर - नवरात्र-गरबा उत्सवात ( Navratri Garba festival ) आधार कार्ड तपासूनच प्रत्येकाला मंडपात प्रवेश द्या,अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून ( Vishwa Hindu Parishad ) करण्यात आली आहे. लव-जिहाद ( Love Jihad ) सारख्या अप्रिय घटना टाळायच्या असतील तर आत्ताच काळजी घेतलेली बरी असा तर्क विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आला आहे.

Navratri
गरबा उत्सव
author img

By

Published : Sep 26, 2022, 10:48 AM IST

Updated : Sep 26, 2022, 10:59 AM IST

नागपूर - नवरात्र-गरबा उत्सवात ( Navratri Garba festival ) आधार कार्ड तपासूनच प्रत्येकाला मंडपात प्रवेश द्या,अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून ( Vishwa Hindu Parishad ) करण्यात आली आहे. लव-जिहाद ( Love Jihad ) सारख्या अप्रिय घटना टाळायच्या असतील तर आत्ताच काळजी घेतलेली बरी असा तर्क विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आला आहे.

गरबा उत्सवात लव्ह जिहाद सारख्या घटना - गरबा उत्सवात श्रद्धा नसतानाही अनेक इतर धर्मीय प्रवेश करतात. हिंदू महिला, तरुणींची छेड काढतात. पुढे लव्ह जिहाद सारख्या समस्या निर्माण होतात. गरबा उत्सव हा श्रद्धेचा, उपासनेचा विषय आहे. तो सार्वजनिक इव्हेंट नाही, त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी फक्त हिंदू धर्मियांना प्रवेश दिला जावा. त्यासाठी प्रत्येकाचे आधारकार्ड तपासले जावे, अशी सूचना विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. गरबा उत्सव आयोजन करणाऱ्यांना मंडळांना केली आहे.

गरज भासल्यास विहिप कार्यकर्ते उभे राहती - यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेने विदर्भात अनेक ठिकाणी गरबा आयोजन करणाऱ्या मंडळांची भेट घेतली आहे. तर पोलीस अधिकाऱ्यांशी भेटणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत प्रमुख गोविंद शेंडे यांनी दिली आहे. गरज भासल्यास विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते गरबा उत्सव आयोजन स्थळे उभे राहून मंडळांना मदत करतील. आयोजन मंडळ आणि पोलिसांनी यात पुढाकार घ्यावा असे शेंडे म्हणाले.

Last Updated : Sep 26, 2022, 10:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.