ETV Bharat / city

Dussehra Special : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव; जाणून घ्या इतिहास - etv bharat marathi

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असते. विजयादशमी उत्सवाच्या माध्यमातून सरसंघचालक स्वयंसेवकांना बौद्धिक मार्गदर्शन देखील करतात. त्यांच्या भाषणाला एकप्रकारे सिग्नेचर स्पीचची मान्यता आहे.

file photo
फाईल फोटो
author img

By

Published : Oct 15, 2021, 2:34 AM IST

Updated : Oct 15, 2021, 3:25 AM IST

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे, कारण या उत्सवाच्या माध्यमातून संघ आपल्या संघटन कौशल्याचे एकाप्रकारे शक्तिप्रदर्शन करत असतो. विजयादशमी उत्सवाच्या माध्यमातून सरसंघचालक स्वयंसेवकांना बौद्धिक मार्गदर्शन देखील करतात. त्यांच्या भाषणाला एकप्रकारे सिग्नेचर स्पीचची मान्यता आहे. त्यांच्या भाषणाचा प्रभाव देशाच्या राजकारणात, अर्थकारणात, सांस्कृतिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात दिसून येतो. त्यामुळे संघाचा विजयादशमी उत्सव स्वयंसेवकांसाठी दिशादर्शक मानला जातो. संघाच्या विजयादशमी उत्सवात आणखी काय-काय होते? कोण उपस्थित असतात? यामागचा इतिहास काय आहे? या संदर्भात माहिती जाणून घेऊया....

दिलीप देवधर - संघ अभ्यासक

हेही वाचा - Dussehra Special सर्व वाईट शक्तींचे करा दहन, मात्र जाणून घ्या रावणातील हे '7' गुण

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना:-

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर १९२५ साली केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती. तो दिवस विजयादशमीचा होता. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी संघाच्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी संघ हा ९६ वर्षांचा झाला आहे. आरएसएस ही एक हिंदुत्ववादी सामाजिक आणि कौटुंबिक संघटना आहे. देशातील सर्वात मोठे संघटन म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसचा उल्लेख होतो. दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शस्त्रपूजन देखील केले जाते, हिंदू मान्यतेनुसार शस्त्र पूजनाला फार महत्त्व आहे.

  • विजयादशमी उत्सव परंपरा-

२७ सप्टेंबर १९२५ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापन झाली, तो दिवस विजयादशमीचा होता. आद्य सरसंघचालक हेडगेवार यांनी ही परंपरा सुरू केली होती. गेल्या ९६ वर्षांपासून ही परंपरा अविरतपणे सुरू आहे.

  • डॉ. मोहन भागवत सहावे सरसंघचालक:-

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार हे होते. मात्र, हिंदू मान्यतेनुसार आकड्यांची सुरुवात ही शून्यपासून होते, ते आद्य सरसंघचालक ठरले. प्रथम सरसंघचालक हे डॉ. परांजपे होते ( हेडगेवार कारागृहात असल्याने वर्षभरासाठी त्यांनी कार्यकाळ सांभाळला) द्वितीय गोळवलकर गुरुजी, तृतीय बाळासाहेब देवरस, चतुर्थ राजेंद्र सिंग, पंचम सुदर्शनजी, सहावे आणि सातवे डॉ. मोहन भागवत आहेत.

हेही वाचा - Dussehra 2021 : दसऱ्याच्या 'या' आहेत महत्त्वपूर्ण परंपरा

Last Updated : Oct 15, 2021, 3:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.