ETV Bharat / city

Minister Vijay Vadettiwar : सरसंघचालकांच्या भूमिकेचे स्वागत, परंतु त्यांनी ठाम राहावे - विजय वडेट्टीवार - काँग्रेस नेते राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार

राम मंदिराच्या आंदोलनानंतर भविष्यात यापुढे आरएसएस कोणतेही मंदिर आंदोलन करणार नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी घेतली आहे. प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची गरज काय, असे देखील मोहन भागवत म्हणाले आहेत. सरसंघचालकांच्या या भूमिकेचे विजय वडेट्टीवार ( Minister Vijay Vadettiwar ) यांनी स्वागत केले आहे. परंतु त्यांनी आपल्या भूमिकेवर कायम राहावे, असे देखील ते म्हणाले आहेत.

Vijay Vadettiwar
Vijay Vadettiwar
author img

By

Published : Jun 3, 2022, 1:43 PM IST

नागपूर: पुन्हा कोरोना निर्बंधाची आवश्यकताच पडू नये यासाठी नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी. पुढची परिस्थिती पाहून राज्य सरकार योग्य निर्णय घेईल, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार ( State Disaster Management Minister Vijay Vadettiwar ) यांनी दिली. ते आज नागपुरात बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले की, येत्या दिवसात शाळा आणि महाविद्यालये उघडणार आहेत. तसेच पावसाळ्याचे दिवस आहेत. संसर्ग वाढूच नये यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले.

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार

राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी हा काँग्रेससचा ( Elections should be uncontested ) प्रयत्न आहे. यासाठी काँग्रेस नेते राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांची भेट घेणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. सध्या सामान्य जनतेचे मुद्दे सोडून इतर मुद्द्यांवर जास्त चर्चा होत असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकी संदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

सरसंघचालकांनी आपल्या भूमिकेवर कायम राहावे -

राम मंदिराच्या आंदोलनानंतर भविष्यात यापुढे आरएसएस कोणतेही मंदिर आंदोलन करणार नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ( Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat ) यांनी घेतली आहे. प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची गरज काय, असे देखील मोहन भागवत म्हणाले आहेत. सरसंघप्रमुखांच्या या भूमिकेचे वडेट्टीवार यांनी स्वागत केले आहे. परंतु त्यांनी आपल्या भूमिकेवर कायम राहावे ( Sarsanghchalak will continue with our role ), असे देखील ते म्हणाले आहेत.

हेही वाचा - Mohan Bhagwat on Gyanvapi : राममंदिरा नंतर आता आम्हाला आंदोलन करायचे नाही - मोहन भागवत

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.