नागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ( मेयो ) रुग्णालयात दुपारच्या सुमारास एका ओळीतील ५ व्हेंटिलेटर काही काळासाठी अचानक बंद झाले. यावेळी हे व्हेंटिलेटर बॅटरीवर करण्यात आले होते. यातील एक व्हेंटिलेटर बदलवत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने लाईन ट्रिप होऊन बंद पडली. याच दरम्यान शॉर्टसर्किटने आग लागल्याची अफवा पसरली पण ती खरी नाही, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी खुलासा देत केली आहे.
यात आयसीयूमधील पाच बेडच्या एका ओळीतील व्हेंटिलेटर बंद पडले. त्यानंतर त्यांना बॅटरीवर लावण्यात आले. तसेच यात एक व्हेंटिलेटर हे खराब झाले होते. यात मात्र व्हेंटिलेटर बंद पडल्याने रुग्णाला हलवण्यात आले. यामुळे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आग लागल्यासंदर्भात अफवा पसरवली जात आहे. मात्र यामध्ये तथ्य नसून सर्व वैद्यकीय व्यवस्था सुव्यवस्थित असून कोणतीही आग लागलेली नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच अफवेला बळी पडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
विभागाची पाहणी केली आहे, सर्व सुव्यवस्थित -
कोविडसह सर्व विभाग व्यवस्थित सुरू असून रुग्णांनी काळजी करू नये. आपण स्वतः या जागेची पाहणी केली असून सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभागाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. सर्व व्हेंटिलेटर व्यवस्थित काम करीत आहे. व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांचा विना अडथळा उपचार सुरू असल्याचे म्हणाले. विद्युत पुरवठा बंद असताना ४ व्हेंटीलेटर बॅटरीवर सुरू होते. नादुरुस्त व्हेंटिलेटर बदलवण्यात आले आहे. या प्रकारामुळे काही वेळ गोंधळ मात्र उडाला होता हे नक्की.
वीज पुरवठा काही काळासाठी अचानक बंद (ट्रीप) झाला होता. मात्र कोणतेही शॉर्टसर्किट झाले नाही. तसेच रुग्णांच्या उपचारामध्ये बाधा आलेली नाही, असा खुलासा इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी केला आहे.
मेयो रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर तांत्रिक कारणाने पडले बंद, आग लागल्याची अफवा - मेयो रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर बंद
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ( मेयो ) रुग्णालयात दुपारच्या सुमारास एका ओळीतील ५ व्हेंटिलेटर काही काळासाठी अचानक बंद झाले. यावेळी हे व्हेंटिलेटर बॅटरीवर करण्यात आले होते. यातील एक व्हेंटिलेटर बदलवत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने लाईन ट्रिप होऊन बंद पडली.