ETV Bharat / city

'विलेज इंडस्ट्रीज' विकसित करण्यासाठी देशात लवकरच 'भारत क्राफ्ट शॉपिंग साईट'

ग्रामीण भागातील वस्तूंची विक्री करण्यासाठी आणि विलेज इंडस्ट्री विकसित करण्याचा दृष्टीने भारत सरकार लवकरच ऑनलाइन वस्तू विक्री करणारी शॉपिंग साईड तयार करणार असल्याची माहिती केंद्रीय मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

Union Minister Nitin Gadkari
नितीन गडकरी
author img

By

Published : Feb 16, 2020, 4:07 AM IST

नागपूर - अमेझॉन,अलीबाबा आणि फ्लिपकार्ट सारख्या जागतिक विपणन ( मार्केटिंग ) पोर्टल्सच्या स्पर्धेत लवकरच भारत सरकार स्वतःचे विपणन पोर्टल उतरणार आहे. ग्रामीण भागातील वस्तूंची विक्री करण्यासाठी आणि विलेज इंडस्ट्री विकसित करण्याचा दृष्टीने भारत सरकार लवकरच ऑनलाइन वस्तू विक्री करणारी शॉपिंग साईड 'भारत क्राफ्ट' नावाने तयार करणार असल्याची माहिती केंद्रीय मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

केंद्रीय मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... ...तर कोरेगाव-भीमा प्रकरणाची राज्य सरकार समांतर चौकशी करेल - गृहमंत्री

ग्रामीण भागात तयार होणाऱ्या उत्पादनांना प्रचंड मागणी असते. मात्र, त्या वस्तू मुख्य बाजारपेठेपर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील दर्जेदार वस्तुंना मार्केटचा उपलब्ध होऊ शकत नाही. यासाठीच मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्रालयाने हे महत्वपूर्ण पाऊल टाकण्याचे ठरवले असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

भारत क्राफ्ट पूर्णपणे ग्रामीण भागात तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देणारे व्यासपीठ असेल. केंद्र सरकारच्या मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग विभागाच्या प्रयत्नांनी या पोर्टलचे काम सध्या सुरु असल्याचे गडकरी म्हणाले. विशेष म्हणजे अमेझॉन, अलीबाबा आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांनी जगभरात विखुरलेल्या त्यांच्या गोदामाच्या माध्यमातून जगभरातील ग्राहकांना सेवा देणे सुरु केले आहे. भारत क्राफ्ट पोर्टल यासाठी देशात आणि जगातील काही ठिकाणी असलेल्या पोस्ट ऑफिसेसचा वापर गोदाम स्वरूपात करेल. असेही गडकरींनी यावेळी सांगितले. शिवाय माल पोहचवण्यासाठी टपाल विभागाचा उपयोग केला जाण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. ज्यामुळे ग्रामीण उद्योगांना चालना तर मिळणारच आहे शिवाय टपाल विभागाला पुनर्जीवन देखील मिळू शकणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.