ETV Bharat / city

Nagpur Corporation Election : अंतर्गत सर्व्हेच्या रिपोर्टकार्डनुसार विद्यमानांना संधी मिळणार; गडकरींचे संकेत

नागपूर पालिका निवडणूक (Nagpur Corporation Election) कधी होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) मात्र आपला बालेकिल्ला राखण्यासाठी कार्यरत झाले आहेत. अंतर्गत सर्व्हेच्या रिपोर्टकार्डनुसार विद्यमानांना संधी मिळणार असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले.

Nitin Gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
author img

By

Published : Mar 4, 2022, 4:39 PM IST

Updated : Mar 4, 2022, 5:47 PM IST

नागपूर - महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक (Nagpur Corporation Election) कधी होणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) मात्र आपला बालेकिल्ला राखण्यासाठी कार्यरत झाले आहेत. विद्यमान नगरसेवकांना आगामी निवडणुकीत संधी देण्याच्या मूडमध्ये ते दिसत नसल्याने अनेकांचे टेन्शन वाढले आहे. आज नागपूर महानगरपालिकेतर्फे नागपूर शहाराचे नावलौकिक करणाऱ्या अनेक क्षेत्रातील दिग्गजांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी रिपोर्टकार्डनुसार विद्यमानांना संधी मिळणार आल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

राजकारणात माझ्याशिवाय नवीन कुणी येऊ नये हे कुणालाही वाटणे स्वाभाविक आहे. कोणत्याही नेत्यांचा कार्यकर्ता असो, ते तोंडावर कौतुक करतात, हवेत उडवतात मात्र जोपर्यंत जनता म्हणणार नाही तोपर्यंत उमेदवारी मिळणार नसल्याचे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

एक अनार सौ बिमार:-

मनपा निवडणुकीत नगरसेवक पदासाठी एक अनार सौ बिमार अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे नितीन गडकरी म्हणाले आहेत. पण मी देवाला प्रार्थना करतो की तुम्हालाच पुन्हा तिकीट मिळो असे सांगून गडकरींनी विद्यमानांची चिंता वाढवली आहे. आज महानगरपालिकेतील नगरसेवकांना सेंड-ऑफ देण्याचा दिवस आहे, त्यामुळे सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा देतो, पण माझ्या हातात तिकीट नाही, सर्व्हेनुसार जनता ज्याला तिकीट द्याययला सांगेल त्यांना तिकीट मिळणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

मंत्र्यांपेक्षा नगरसेवक जनतेच्या जवळचा:-

महानगरपालिका चालवणे खूप कठीण काम आहे. मंत्री, खासदार, आमदारांपेक्षा नगरसेवकांकडूनच जनतेला सर्वात जास्त अपेक्षा असतात. उठता बसता नगरसेवक आपल्या घरासमोर हजर रहावा अशीच इच्छा जनतेची असते, जणू नगरसेवक म्हणजे हजार रुपये महिन्याचा घरगडीच आहे. विपरीत परिस्थितीतसुद्धा नागपूर महानगरपालिका खूप चांगले काम करत आहे, असे म्हणत महापौर आणि मनपा आयुक्तांच्या कामाचे गडकरींनी यावेळी कौतुक केले.

Last Updated : Mar 4, 2022, 5:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.