ETV Bharat / city

कोरोनाचे राजकारण करू नका; समाजसेवा हेच उदिष्ट ठेऊन कार्य करा - गडकरी - देवेंद्र फडणवीसांना गडकरींचा सल्ला

राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही, समाजकारण, विकासकारण आणि राष्ट्रकारण म्हणजे राजकारण आहे. तसेच कोरोना महामारीच्या या कठीण प्रसंगी राजकारण केले तर ते लोकांना आवडत नाही. त्यामुळे तुम्ही केलेल्या सेवा कामाचा फार बागल बुवा करू नका, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते.

nitin gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
author img

By

Published : May 10, 2021, 12:47 PM IST

नागपूर - कोरोना संकटात सुरू असलेल्या राजकारणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह नागपूर शहरातील भाजप नेत्यांचे कान टोचले आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नागपूरच्या भाजप पदाधिकाऱ्यांसोबत नितीन गडकरी यांनी बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी भाजपा नेत्यांसह कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. कोविड काळात राजकारण करू नका, सगळ्याच गोष्टीचा प्रचार आणि प्रसार झेंडे आणि बॅनर लावून करायचा नसतो, असा सल्ला गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही, समाजकारण, विकासकारण आणि राष्ट्रकारण म्हणजे राजकारण आहे. तसेच कोरोना महामारीच्या या कठीण प्रसंगी राजकारण केले तर ते लोकांना आवडत नाही. त्यामुळे तुम्ही केलेल्या सेवा कामाचा फार बागल बुवा करू नका, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते.

समाजसेवा या भावनेतून कार्य सुरू ठेवा -

नुसत्या निवडणुका लढवणे आणि सत्तेत जाणे एवढाच राजकारणाचा भाग नाही. या कठीण काळात गरिबांच्या मागे उभे राहा. तसेच या कोरोना काळात स्वत:चीही काळजी घ्या, आपण अनेक निष्ठावान कार्यकर्ते गमावले आहेत. या पुढे आणखी कुणाला गमावण्याची हिम्मत राहिली नाही. त्यामुळे जनसेवा करताना स्वतःची काळजी घ्या, पक्ष आपला परिवार असला तरी समाज देखील आपले कुटुंब आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या विरोधक असले तरी सगळ्यांच्या मागे उभे राहणे, हे आपले कर्तव्य असल्याचा सल्लाही गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.