ETV Bharat / city

Minister Nitin Gadkari : 'पर्यावरण संरक्षणासाठी मातीच्या मूर्ती खरेदी करा' - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर कार्यक्रम

आपणही मातीच्याच मूर्तींचा खरेदी करा, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ( Plaster of Paris Ganesh idol ) मूर्तिकारांच्या दबावात येऊ नका, असा संकल्प घेण्याचे आवाहन मूर्तिकार आणि नागरिकांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) यांनी केले आहे.

नितीन गडकरी
नितीन गडकरी
author img

By

Published : Jun 5, 2022, 5:32 PM IST

Updated : Jun 5, 2022, 5:39 PM IST

नागपूर - येणाऱ्या गणेशोत्सवात मूर्तिकारांनीही मातीच्याच मूर्ती बनवा आणि आपणही मातीच्याच मूर्तींचा खरेदी करा, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ( Plaster of Paris Ganesh idol ) मूर्तिकारांच्या दबावात येऊ नका, असा संकल्प घेण्याचे आवाहन मूर्तिकार आणि नागरिकांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) यांनी केले आहे. ते नागपुरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्य पर्यावरण पूरक गणेशमूर्ती स्पर्धा आणि प्रदर्शनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमात बोलताना मंत्री नितीन गडकरी

'मातीच्या मूर्तिकाराना बाजार उपलब्ध करून द्या' : आजच्या काळामध्ये कुठल्याही क्षेत्रात मोठे व्हायचे असेल तर त्या कामाची कलेची गुणवत्ता ही महत्त्वाची असते. महत्वाचे म्हणजे मूर्ती बनवताना लागणारा कच्चा माल हा निशुक्ल मिळल्यास फायदा होईल. त्यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या धर्तीवर मूर्तिकार प्रोड्युसर कंपनी तयार करून त्यांना कच्चा माल कमी किंमतीत किंवा निशुल्क देता येईल का? यासाठी खादी ग्रामउद्योगाचे माध्यमातून मदतीसाठी खादी ग्रामोद्योगाचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांना योजना बनवावी, अशा सूचना केंद्रीय मंत्री गडकरीनी यावेळी दिले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पर्यावरणपुरक मूर्तींना चांगला बाजार मिळवण्यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी प्रदर्शनी भरून जाहिरात करून त्यांना बजार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही केंद्रीय मंत्री गडकरी दिल्या आहेत.

'ऑरेंज सिटी बनवण्यासाठी प्रत्येका घरात संत्राचे झाड लावावे' : शहरातील प्रत्येक घरात एक संत्र्याचे झाड लावले पाहिजे. ते झाड स्वतः दरात उपलब्ध करून देऊ. पण त्याचे संगोपन करून खऱ्या अर्थाने ऑरेंज सिटी हे नाव सार्थक केले पाहिजे, यासाठी एक उपक्रम राबवणार असल्याचेही केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले. पर्यावरण दिनानिमित्त झाडे लावत संगोपन करण्यास पर्यावरणासाठी नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याची गरज असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

'सुबक मातीच्या मूर्ती ठरल्या आकर्षक' : या गणेशमूर्ती स्पर्धेत मातीपासून तयार करण्यात आलेल्या 100 च्या घरात मूर्ती ठेवण्यात आलेल्या होत्या. यावेळी एकाहून एक सुबक बोलक्या आणि पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या कलाकृती घडलेळ्या मूर्ती आकर्षण ठरल्यात. मातीपासून ही सुंदर मूर्ती बनू शकतात, असा संदेश देत मातीच्या मूर्तिकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने दक्षिण मध्य सांस्कृतिक आणि पारंपारिक हस्तक कारागीर संघाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेत.

हेही वाचा - World Environment Day : आपली पृथ्वी एकटीच, तिला वाचविणे आपले सर्वांचे कर्तव्य - प्रा. डॉ. जयंत वडतकर

Last Updated : Jun 5, 2022, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.