ETV Bharat / city

कपडे वाळत घालताना विजेच्या तारेचा बसला धक्का; एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू - विजेचा धक्का नागपूर महिला मृत्यू

कळमेश्वरचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी दोन्ही महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

विजेचा धक्का लागून महिलांचा मृत्यू
विजेचा धक्का लागून महिलांचा मृत्यू
author img

By

Published : Oct 6, 2021, 2:31 AM IST

Updated : Oct 6, 2021, 3:23 PM IST

नागपूर - धुतलेले कपडे वाळत घालत असताना अचानकपणे विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे घडली आहे. मंजू पुरुषोत्तम विरुळकर(५५) आणि अलका निरंजन विरुळकर (४२) अशी मृत महिलांची नावे आहेत.

अलका विरुळकर या घरातील अंगणात असलेल्या तारावर धुतलेले ओले कापड वाळत घालत होत्या. त्यावेळी त्या तारेतून विद्युत प्रवाह वाहत असल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे त्या जोरात किंचाळून खाली कोसळल्या. अलका विरुळकर यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्या जाऊ मंजू विरुळकर या धावून पोहोचल्या. अलका यांना स्पर्श केल्याने त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला.

हेही वाचा-नागपुरात कचरा वेचणाऱ्यांमध्ये राडा; घंटीची हत्या

दोन्ही महिलांचा मृत्यू
कळमेश्वरचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी दोन्ही महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

हेही वाचा-lakhimpur Violence : संजय राऊत यांनी घेतली राहुल गांधींची भेट, म्हणाले विरोधकांनी एकत्र येण्याची गरज

तार कट झाल्याने घडली घटना -
अलका विरुळकर कपडे वाळत घालत होत्या, त्या ठिकाणी तारेला एका विजेच्या ताराचा स्पर्श झालेला आढळून आले आहे. विज प्रवाह कापड वाळू घालत असलेल्या तारेत आल्याने ही घटना घडली आल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा-मुंद्रा पोर्ट ड्रग प्रकरणात अदानींना मोदी सरकार कधी अटक करणार?; काँग्रेसचा सवाल

Last Updated : Oct 6, 2021, 3:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.