ETV Bharat / city

खासगी बसची मालमोटारीला धडक, मध्यप्रदेशातील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू - Nagpur district news

नागपूर-सावनेर मार्गावरील पाटनसावंगी पुलावर भीषण अपघात घडला आहे. मध्यप्रदेशच्या इंदूर व भोपाळहून प्रवाशांना घेऊन नागपूरला येत असलेल्या रॉयल स्टार नामक खासगी प्रवासी बसने मालमोटारीला धडक दिली. यात मालवाहू मोटारीतील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

spot
अपघातग्रस्त वाहन
author img

By

Published : Mar 18, 2021, 8:22 PM IST

नागपूर - नागपूर-सावनेर मार्गावरील पाटनसावंगी पुलावर भीषण अपघात घडला आहे. मध्यप्रदेशच्या इंदूर व भोपाळहून प्रवाशांना घेऊन नागपूरला येत असलेल्या रॉयल स्टार नामक खासगी प्रवासी बसने मालमोटारीला धडक दिली. यात मालवाहू मोटारीतील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

घटनास्थळ

पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, बसने मालमोटारीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. दोघेही शेतकरी असून ते मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथील रहिवासी आहेत. धनराज वानखडे आणि शिवराम चौरिया, अशी त्यांची नावे आहेत. ते मालवाहू गाडीत बसून नागपूरच्या बाजारात लसूण विकण्यासाठी येत होते. बस चालकाने मालमोटारीला मागे टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, बस चालकाचा अंदाज चुकला यामुळे बस मालमोटारीवर धडकली. या अपघातात मालमोटारीच्या मागच्या बाजूला बसलेले धनराज वानखडे व शिवराम चौरिया यांचा गाडीखाली पडून मृत्यू झाला.

अपघातात बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. बस चालकासह बसचालकासह 9 जण जखमी झाले आहेत. हे सर्व जखमी इंदूर, भोपाळ, देवास आणि नागपूरचे रहिवासी आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती समजताच सावनेर पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली होती. जखमींना सावनेर येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा - नागपुरात कोरोनाचे थैमान सुरु असताना ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस

हेही वाचा - बहुचर्चित एकनाथ निमगडे हत्या प्रकरणाचा उलगडा, कुख्यात गुंड रणजित सफेलकर म्होरक्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.