ETV Bharat / city

जुगार खेळणे बितले जीवावर: पोलीस पकडतील या भीतीने नाल्यात घेतली उडी; नागपुरातील दोघांचा मृत्यू

author img

By

Published : Jul 27, 2019, 5:35 PM IST

पोलिसांचा छापा पडणार असल्याचे समजताच चार जुगाऱ्यांनी पोलीस पकडतील या भितीने जवळच्या नाल्यात उडी घेतली. त्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला असल्याची घटना नागपूर शहराबाहेरील बहादुरा गावाशेजारी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.

दोघांचा मृत्यू

नागपूर - जुगार खेळत असताना पोलिसांचा छापा पडणार असल्याचे समजताच चार जुगाऱ्यांनी पोलीस पकडतील या भितीने जवळच्या नाल्यात उडी घेतली. त्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला असल्याची घटना नागपूर शहराबाहेरील बहादुरा गावाशेजारी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी शोध घेतला असता दोन्ही मृतदेह मिळून आले.

पोलीस आपल्याला अटक करतील या भीतीने जुगरींनी ज्या दिशेने वाट मिळाली त्या दिशेने पळ काढला. त्यापैकी 4 जणांनी नाल्यात उडी घेतली. त्यापैकी दोघांना नाल्याबाहेर पडण्यात यश मिळाले. मात्र, दोघांना पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी पोलिसांना माहिती समजताच त्यांचा शोध सुरू केला. त्यात एकाचा मृतदेह सापडला. त्यानंतर काही वेळाने दुसराही मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश मिळाले. नागपूर पोलिसांनी गेल्या अनेक दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापा टाकून कारवाई सुरु केली आहे.

Intro:नागपूर शहराच्या सीमावर्ती भागातील बहादुरा गावाच्या बाहेर असलेल्या नाल्यात बुडल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे....
पोलिसांची नजर चुकवून सुनसान जागेवर जुगार खेळत असताना पोलिसांचा छापा पडल्याच्या भीतीने पळून जाण्याचा नादात 4 जुगरींनी मोठ्या नाल्यात उडी घेतली असता त्यातच दोघांचा मृत्यू झाला आहे...मृतकांपैकी एकाच मृतदेह बाहेर काढण्यात पोकिसांना यश आले आहे तर एकाच शोध घेतला जातोय...मृतकांमध्ये सोनू उर्फ इरफान शेख,जावेद इकबाल शेख यांचा समावेश आहे Body:स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार काल रात्रीच्या वेळी नागपूर शहरातील 8 ते 10 तरुण जुगार खेळण्यासाठी नागपूर शहराबाहेरील बहादुरा गावाच्या नाल्या शेजारी गोळा झाले होते....जुगार खेळताना दारूचे जाम रिचवले जात होते...त्याच वेळी गुन्हे शाखेचे एका पथकाला बहादुरा गावाच्या बाहेर असलेल्या नाल्या शेजारी जुगाराचा खेळ रंगला असल्याची माहिती समजली...क्राईम ब्रँचच्या पथकाने त्या ठिकाणी रेड मारण्यासाठी बहादुरा गाव गाठतात पोलीस आपल्या दिशेने येत असल्याची माहिती जुगरींना समजली....पोलीस आपल्याला अटक करतील या भीतीने ज्या जुगरींनी ज्या दिशेने वाट मिळाली त्या दिशेने पळ काढला,त्यापैकी 4 जणांनी नाल्यात उडी घेतली,मात्र त्यापैकी दोघांना नाल्या बाहेर पडण्याचा यश मिळाले मात्र दोघांना पोहता येत नासल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे...आज सकाळी पोलिसांनी या संदर्भात माहीती समजल्या नंतर त्यांचा शोध सुरू केला असता एकाचा मृतदेह सापडलेला असून एकाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे ....नागपूर पोलिसांनी गेल्या अनेक दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या जुगार अंड्यांवर छापेमार कारवाई सुरू केली असल्याने जुगरींनी शहराबाहेरील सुरक्षित स्थळ निवडायला सुरवात केली आहे Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.