ETV Bharat / city

जुना वाद; नागपुरात दोन गुंडांचा एकमेकांच्या घरावर हल्ला - nagpur crime news

नागपुरात जुन्या भांडणाच्या रागातून दोन गटातील गुंडांनी एकमेकांच्या घरावर हल्ला केला आहे. पलाश वासनिक व राजा परचाके उर्फ भिक्कुराजा असे या दोन गुंडांची नावे आहेत.

nagpur
नागपुरात दोन गुंडांचा एकमेकांच्या घरावर हल्ला
author img

By

Published : Sep 17, 2020, 5:50 PM IST

नागपूर - इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबाग परिसरात दोन गटात सुरू असलेल्या वादातून रात्री पलाश वासनिकसह त्याच्या साथीदारांनी दुसऱ्या गटातील राजा परचाके उर्फ भिक्कुराजा नामक गुंडाच्या घरावर हल्ला केला. आरोपींनी भिक्कुराजाच्या घरातील संपूर्ण सामानाची तोडफोड करत घरातील सदस्यांनासुद्धा मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी परिसरातील अनेक दुचाकींसह काही ऑटोरिक्षांची तोडफोड केली आहे. महत्वाचे म्हणजे दोन दिवसांपूर्वी भिक्कुराजाने देखील पलाशच्या घरावर हल्ला केला होता.

नागपुरात दोन गुंडांचा एकमेकांच्या घरावर हल्ला

हेही वाचा - विसरवाडीत बनावट ऑईल कारखान्याला भीषण आग, ५ घरे जळून खाक

दोन दिवसांपूर्वी इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामबाग येथे राहणारा पलाश उर्फ गन्नी प्रकाश वासनिक हा घरी आपल्या अंगणात उभा होता. त्यावेळी आरोपी भिक्कु उर्फ राजु परचाके याच्यासोबत झालेल्या जुन्या वादाच्या कारणावरून अजय पाहुणे, धीरज अविनाश मंडपे आणि अजिंक्य नावाचा व्यक्ती आणि इतर साथीदार काठ्या आणि लोखंडी शस्त्र घेवून पलाश वासनिकच्या घरावर हल्ला करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पलाश हा घाबरून घराजवळील बिल्डींगच्या छतावर जाऊन लपला. आरोपींनी हत्यारासह पलाशच्या घरासमोर येवून त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती.

हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते. त्यासंदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली असता, बुधवारी रात्री बारा वाजल्याच्या सुमारास पलाश वासनिकनेसुद्धा आपल्या साथीदारांना घेऊन राजाभाऊ परचाके उर्फ भिक्कुराजा नामक गुंडाच्या घरावर हल्ला केला. त्यावेळी भिक्कुराजा घरी नसल्याने पलाश वासनिक आणि त्याच्या साथीदारांनी भिक्कुच्या घरातील सामानाची नासधूस केली. तसेच परिसरातील दुचाकी वाहनांसह, ऑटोरिक्षाची तोडफोड केली आहे. या दोन्ही घटनांमुळे रामबाग परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.