ETV Bharat / city

नागपूर पदवीधर निवडणूक : मतदानाची वाढलेली टक्केवारी प्रस्थापितांसाठी धोक्याची घंटा? - नागपूर पदवीधर निवडणूक बातमी

नागपूर विभागाच्या पदवीधर निवडणुकीचे मतदान मंगळवारी शांततेत पार पडल्यानंतर आज अंतिम टक्केवारी पुढे आली आहे. नागपूर विभागात ६४.३८ टक्के मतदान झाले आहे.

nagpur
नागपूर पदवीधर निवडणूक
author img

By

Published : Dec 2, 2020, 7:50 PM IST

नागपूर - नागपूर विभागाच्या पदवीधर निवडणुकीचे मतदान काल शांततेत पार पडल्यानंतर आज अंतिम टक्केवारी पुढे आली आहे. नागपूर विभागात ६४.३८ टक्के मतदान झाल्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या मनात धडकी भरली आहे. २०१४ साली झालेल्या या निवडणुकीत केवळ ३७ टक्के मतदानाची नोंद झाली होती, मात्र यावेळी तब्बल २७ टक्क्यांनी मतदान वाढले असल्यामुळे भाजपसाठी धोक्याची घंटा वाजली असल्याची चर्चा सुरू झाली आहे, कारण गेल्या ५८ वर्षांपासून या मतदार संघात भाजपचाच कब्जा राहिलेला आहे. ही शक्यता सत्यात उतरल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकरिता मोठा झटका असणार आहे. हे सर्व तर्क-वितर्क असले तरी उद्या मतमोजणीनंतरच नेमके चित्र स्पष्ठ होणार आहे. मात्र त्याआधी या तर्कवितर्कांमुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा - बॉलिवूड मुंबईतून काही हलणार नाही- रामदास आठवले

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ म्हणजे भाजप असे समीकरण गेल्या ५८ वर्षांपासून राज्यात तयार झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दिवंगत गंगाधरराव फडणवीस, पंडित बछयराज व्यास आणि अनिल सोले सारख्या नेत्यांनी पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व केलेलं आहे. गेल्या निवडणुकीत प्राध्यापक अनिल सोले यांनी अगदी आरामात विजय मिळवला होता. मात्र यावेळी काँग्रेसचे उमेदवार ऍड अभिजित वंजारी यांनी सुमारे वर्षभरापूर्वी पासूनच तयारी सुरू केली होती तर ऐन वेळेवर भाजपने महापौर संदीप जोशी यांच्या गळ्यात उमेदवार पदाची माळ टाकल्याने त्यांना फार काही करण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे देखील निकालासंदर्भात आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

वाढीव मतदान कुणासाठी धोक्याचे

नव्याने तयार झालेल्या मतदार यादीत सुमारे ८५ हजार मतदारांचे अर्ज भरण्यात आल्याचा दावा केला जातो आहे. तर दुसरे उमेदवार राजेंद्र भुतडा यांनी देखील ३५ हजार फ्रॉम भरल्याचा दावा केला आहे. या सर्व दावे प्रति दाव्यानंतर काल मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आज या निवडणुकीत झालेल्या मतदानाचे नेमके आकडे पुढे आले आहेत, ज्यामध्ये ६४.३८ टक्के मतदान झाल्याचं पुढे आल्यानंतर सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे. पदवीधर निवडणुकीत एकूण दोन लाख सहा हजार मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ३२ हजार ९२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ६९.४१ टक्के इतकी आहेत तर ५६.६२ टक्के महिलांनी मतदान केले आहे. ही वाढलेली टक्केवारी आमच्या फायद्याची असल्याचा दावा सर्वच पक्षांनी केला आहे. मात्र, ही वाढीव मतदानाची टक्केवारी भाजप उमेदवारासाठी धोक्याची तर नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा - धक्कादायक! एनसीबीच्या जाळ्यात टॅक्सीचालक; कोट्यवधीची संपत्तीसह महागड्या वाहनांचा आहे मालक

शहरी मतदार ठरवणार उमेदवारांचे भाग्य

पदवीधर निवडणुकीच्या मतदानात शहरी भागातील मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. प्रामुख्याने शहरी भागावर भाजपचे वर्चस्व असल्या्चं समजलं जातं तर ग्रामीण भाग काँग्रेसच्या बाजूने असल्याचं समजलं जातं. या निवडणुकीत शहरी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला आहे,त्या तुलनेत ग्रामीण भागात मतदान कमी झालेलं आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल कुणाच्या बाजूने लागले हे बघणे महत्वाचे ठरणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.