ETV Bharat / city

Three Months Suspend Driving Licence : विना हेल्मेट दुचाकी चालवाल तर तीन महिन्यासाठी परवाना होणार निलंबित - Bike Riding Without Helmet

राज्यात नवीन मोटार वाहन कायद्याचा अंमलबजावणीला सुरुवात झाली. उपराजधानी नागपुरात पहिल्याच दणक्यात तब्बल 11 हजारांपेक्षा जास्त वाहनचालकांवर वाहन परवाना निलंबनाची कारवाई ( Three Months Suspend Driving Licence ) झाली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई हेल्मेट न घालणे ( Bike Riding Without Helmet ) तसेच ट्रिपल सीट दुचाकी चालविताना पहिल्यांदाच मिळून आले तरी ही कारवाई झाली आहे. काय आहे नवीन नियम जाणून घेऊया 'ईटीव्ही भारत'च्या या विशेष वृत्तात.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Dec 26, 2021, 6:32 PM IST

नागपूर - राज्यात नवीन मोटार वाहन कायद्याचा अंमलबजावणीला सुरुवात झाली. उपराजधानी नागपुरात पहिल्याच दणक्यात तब्बल 11 हजारांपेक्षा जास्त वाहनचालकांवर वाहन परवाना निलंबनाची कारवाई ( Three Months Suspend Driving Licence ) झाली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई हेल्मेट न घालणे ( Bike Riding Without Helmet ) तसेच ट्रिपल सीट दुचाकी चालविताना पहिल्यांदाच मिळून आले तरी ही कारवाई झाली आहे. यामुळे घराबाहेर हेल्मेटशिवाय बाहेर पडल्यास दंडासोबत तीन महिने वाहन चालवता येणारे नाही, अशी तरतूद आहे.

विना हेल्मेट दुचाकी चालवाल तर तीन महिन्यासाठी परवाना होणार निलंबित

परवाना निलंबित केल्यानंतरही वाहन चालवल्यास दंड अन् फौजदारी कारवाई होईल

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यावर होणारे अपघात आणि मृत्यू कमी करण्यासाठी दंडाच्या रक्कमेत वाढ केली होती. अनेक दशकांपासून सुरू असलेल्या 100 ते 500 रुपये दंडाची रक्कम वाढवून तब्बल 10 हजारापर्यंत करण्याचा निर्णय 2019 मध्येच घेण्यात आला होता. पण, त्यावेळी महाराष्ट्रात कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली नव्हती. तब्बल दोन वर्षांनी अंमलबजावणीला महाराष्ट्रात सुरुवात झाली. यात उपराजधानी नागपुरातही कायद्याची अंमलबजावणी होताच 11 हजार 463 पेक्षा जास्त वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली जाणार आहे. यामध्ये पहिल्यांदाच विना हेल्मेट किंवा ट्रिपलसीट मिळून आल्यास 1 हजार रुपये दंड भरावा लागणार आणि 3 महिने वाहन चालवण्यास बंदी असणार आहे. वाहतूक परवाना निलंबनानंतर जर कोणी वाहन चालवताना मिळून आल्यास दंडाच्या रक्कमेत वाढणार शिवाय फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची तरतूद आहे. यामुळे वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यास वाहन चालकांना चांगलेच महागात पडणार आहे.

अवघ्या 12 दिवसांत विविध कारवाईत लाखोंचा दंड वसूल...

वाहतूक नियमापेक्षा जास्त वेगाने किंवा बेशिस्त वाहन चालवणे अशा 32 वेग-वेगळ्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. सुसाट वाहन चालवलेल्या 500 लोकांकडून 1 हजार ते 4 हजार रुपयापर्यंत दंड वसूल करण्यात आला आहे. नागपूर शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाकडून सुमारे 24 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच 200 पेक्षा जास्त वाहन चालक जे फॅन्सी नंबरप्लेट ( Fancy Number Plate ) लावून फिरत होते, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. विना परवाना वाहन चालवणाऱ्यांकडून 5 हजार रुपये प्रमाणे दंड वसुली केली असून अशा 130 वाहन चालकांना दंड ठोठावल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी दिली आहे.

वाहन मालकांना एसएमएसद्वारे माहिती

नवीन मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी होण्यापूर्वी मागील वर्षी 55 हजार परवाने रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव परिवहन विभागाकडे पाठवण्यात आला होता. पण, नवीन मोटार वाहन कायद्यानुसार तसेच वाहनचालकांचा रेकॉर्ड ऑनलाइन उपलब्ध असल्याने कारवाई करणे सोपे झाले आहे. वाहन मालकांना एसएमएसद्वारे याची माहिती नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवली जाणार आहे.

हे ही वाचा - अजब! थंडीपासून बचावासाठी चोरट्याने पेटवली बाईक; एकाने पाठवला इमोशनल व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.