ETV Bharat / city

Ganeshotsav राज्यभरात गणेशोत्सव निर्बंधमुक्त असले तरी नागपुरात निर्बंधाची साखळी आणखी घट्ट - गणेशोत्सवाबाबत काय निर्बंध आहेत

यावर्षी सर्वचं सण आणि उत्सवे निर्बंध मुक्त होऊन साजरे करता येतील अशी घोषणाचे राज्य सरकारने केल्यानंतर मात्र नागपुरात अजूनही बांधनाच्या बेड्या कायम ठेवण्याचा प्रयत्न नागपूर महानगर पालिकेकडून केला जात असल्याचा आरोप गणेश मंडळ आणि मूर्तिकारांकडून केला जातो आहे यामागे कारणही तसेच आहे कोरोना काळात गणेशोत्सवासाठी लावण्यात आलेले नियम यावर्षी सुद्धा पाळावे असे आवाहन नागपूर महापालिकेने केले आहे त्यानुसार घरघुती गणेश मूर्ती ही दोन फूट उंचीची आणि सार्वजनिक मंडळातील गणेश मूर्तीची उंची चार फुटांपर्यंत असावी असे आवाहन महानगरपालिके कडून करण्यात आले आहे त्यामुळे मूर्तिकार आणि मंडळाचे पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळाची परीस्थितीत निर्माण झाली आहे

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Aug 16, 2022, 9:36 PM IST

नागपूर - कोविड १९अर्थात कोरोना महामारीचा धोका आता पूर्णपणे कमी झाल्याने यावर्षी सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत तब्बल दोन वर्षांनी बेरंग झालेल्या उत्सवांमध्ये रंग भरले जाणार असल्याने समाजातील प्रत्येक घटक आनंदी आहे अशात पहिला सर्वात मोठा सार्वजनिक उत्सव म्ह्णून विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होणार या कल्पनेने मुर्तीकार गणेश मंडळे आणि भक्तांमध्ये उत्साह वाढला आहे मात्र उपराजधानी नागपुरातील मूर्तिकार गणेश मंडळातील पदाधिकारी आणि भक्त नागपुर महानगर पालिकेने केलेल्या अवाहनामुळे विचारात पडले आहेत

गणेशोत्सवातील निर्बंधांबाबत ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट

महानगरपालिकेने काय केले आहे आवाहन महाराष्ट्र राज्य शासनाने गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटवले असले तरी या निर्णयाची नागपूर शहरात अंमलबजावणी करता येणार नाही त्यानुसार घरघुती गणेश मूर्त्यांची उंची दोन फुटांपेक्षा अधिक राहणार नाही याची काळजी नागरिकांना घ्यायची आहे त्याच बरोबर सार्वजनिक गणेश मूर्त्यांची उंची ४ फुटांपर्यंत असावी मनपाने घालून दिलेल्या नियमांच्या निकषात बसणाऱ्या मूर्त्यांच्या विसर्जनाची व्यवस्था महानगरपालिके कडून केली जाणार आहे

शहरातील सर्व तलाव विसर्जनासाठी बंद नागपूर महानगरपालिकेचे प्रशासक राधाकृष्ण बी यांनी दिलेल्या आदेशानुसार यावर्षी शहरातील सर्व तलाव मूर्ती विसर्जनासाठी प्रतिबंधित करण्यात आले आहेत निकषात बसणाऱ्या गणेश मूर्ती मनपाच्या कृत्रिम टॅंक मध्ये विसर्जित केल्या जातील मात्र ज्या मूर्ती निकषात बसत नसतील त्या मुर्त्यांच्या विसर्जनाची जबाबदारी मंडळांनी स्वतः घ्यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे शिवाय विसर्जन कुठे आणि कसे करणार हे देखील मनपाला कळवावे लागणार आहे या शिवाय नियमानुसार गणेशोत्सवापूर्वी मंडळांना नागपूर महानगरपालिकेकडून परवानगी घ्यावी लागणार आहे

गणेश मुर्त्यांचे काम अंतिम टप्यात महाराष्ट्र निर्बंध मुक्त झाल्याची घोषणा होताच मूर्तिकारांनी मोठ्या आकाराच्या मुर्त्यांचे ऑर्डर घेऊन काम सुरू केले होते आता मोठ्या प्रमाणात मुर्त्या तयार झालेल्या आहेत एवढेच नाही तर मुर्त्यांना रंग देण्याचे काम देखील सुरू झाले आहे अशा परिस्थितीत इतक्या कमी वेळेत लहान आकाराच्या मुर्त्या तयार कश्या करायच्या असा प्रश्न मूर्तिकार विचारत आहेत

हेही वाचा - Vinayak Metes accident विनायक मेटे यांचा अपघात कार्यकर्त्यांना घातपाताचा संशय, पत्नीचेही आक्षेप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.