ETV Bharat / city

'फ्लू'ची लस कोविड-१९ करीता प्रभावी नाहीच; नागपूरातील तज्ञ डॉक्टरांचे मत

author img

By

Published : Dec 18, 2020, 5:22 PM IST

Updated : Dec 18, 2020, 5:53 PM IST

अनेक लोकांना वाटत आहे की, फ्लूची लस कोविड १९पासून आपले संरक्षण करते. मात्र, हा मोठा गैरसमज आहे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही नागपूरातील तज्ञ डॉक्टर वाय. एस. देशपांडे यांच्याशी बातचीत केली.

'फ्लू'ची लस
'फ्लू'ची लस

नागपूर - कोरोनावरील लसीची आस सर्वांनाच लागली आहे. त्यादृष्टीने विविध प्रयोगशाळेत लसीच्या संशोधनाचे काम सुरू आहेत. अशावेळी सर्वसामान्य व्यक्तीकडून फ्लू ची लस घेतल्यामुळे कोरोनाची भीती कमी असते. असा समज आहे. मात्र फ्लू ची लस ही कोरोनावर प्रभावी नाही. असे मत नागपूरातील तज्ञ डॉक्टर वाय. एस. देशपांडे यांचे आहे. शिवाय कोरोनाच्या लसीकरणाची गरज काही ठराविक घटकांनाच आहे. त्यामुळे फ्लु लस आणि कोरोना लस यात फरक आहे. अशी स्पष्टोक्तीही तज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.

डॉक्टर वाय. एस. देशपांडे
लसीवरून नागरिकांचा गैरसमज-देशभरात वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता कोविड १९ च्या लसीचे संशोधन कार्य झपाट्याने सुरू आहेत. अशावेळी नागरिकांमधील भीती पाहता अनेक जण फ्लू ची लस घेत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय या फ्लूच्या लसीमुळे कोरोनाचा धोका नाही, असा समजही अनेकांनी करून घेतलाय. परंतु हा नागरिकांचा गैरसमज असल्याचे मत तज्ञ डॉक्टरांकडून वर्तविण्यात आले आहे. 'फ्लू'ची लस ढाल नाहीच-फ्लूची लस ही कोरोनाची ढाल म्हणून काम करू शकत नाही. कारण फ्लूची लस पूर्णतः वेगळी आहे. फ्लूचा संसर्ग हा सर्वसाधारणपणे श्वसन क्रियेतून होतो. मात्र कोरोना संसर्ग श्वसनाबरोबरच इतरत्र असलेल्या वस्तुच्या संपर्कामुळे होतो. त्यामुळे फ्लू आणि कोरोना यात खूप फरक आहे, असे मत डॉ. वाय. एस. देशपांडे यांचे आहे. त्यामुळे नागरिकांमधे फ्लू लस आणि कोरोना लस याबाबत बराच संभ्रम असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले. फ्लू विषाणू आणि कोरोना विषाणू फरक-शिवाय कोरोना विषाणू आणि फ्लू'च्या विषाणूमधे खूप फरक आहे. कोरोना विषाणू एकमेकांच्या संपर्कामुळे, रूग्णांच्या सहवासातून पसरतो. तर फ्लूचे विषाणू हे सामान्यतः श्वसनातून पसरत असतात. त्यात अनेक बदल सुद्धा असतात. त्यामुळे दोन्ही विषाणू व बाबी पूर्णतः वेगळ्या आहेत. असेही तज्ञांचे मत आहे. यांना आहे लसीकरणाची खरी गरज-

त्याचबरोबर देशात सध्या कोरोना लसीकरणाची तयारी सुरू आहे. अनेक नागरिक लसीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र कोरोना लसीकरणाची खरी गरज आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना आणि ज्यांची रोगप्रकारक शक्ती अत्यंत कमी आहे, अशा व्यक्तींनाच आहे. त्यामुळे सरसकट सर्वांनाच लसीकरण गरजेचे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया तज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.

भीतीपोटी नागरिकही सावध-

शिवाय बाजारपेठेत फ्लूच्या लसीची विक्री हे नेहमी प्रमाणेच असल्याचे दिसून येत आहे. मात्र कोरोनाच्या भीती पोटी अनेक जण आपल्या प्रकृतीत थोडे जरी बदल वाटू लागले तर डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचे दिसून येत आहे. तसेच कोरोना लसी बाबतही डॉक्टरांकडून माहीती घेतांना पहायला मिळत आहे. मात्र फ्लू आणि कोरोना ह्या दोन्ही बाबी पूर्णतः भिन्न असल्याची माहीती तज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.

हेही वाचा- आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन : कोरोना काळात भारतातील स्थलांतरितांचे प्रश्न

हेही वाचा- राज्य सरकारचे सल्लागार राज्याला बुडवायला निघाले आहेत - फडणवीस

Last Updated : Dec 18, 2020, 5:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.