नागपूर - शहरातील इतवारी भागात चुना ओळ येथील 'जंगल्यासी इंटरप्रायजेस' नावाच्या इमारतीला आज पहाटे भीषण आग लागली. अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
'जंगल्यासी इंटरप्रायजेस' इमारतीच्या तळ मजल्यावर विविध प्लास्टिक वस्तू, नायलॉनची दोरी आणि रंगांचे दुकान आहे, तर वरचे तीन मजल्यांवर गोदाम आहेत. इमारतीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या वस्तू असल्याने ही आग तीव्रतेने सर्वच मजल्यांवर पसरली. सभोवताली अनेक इमारती असल्याने आग पसरण्याची भीती होती.
ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग सभोवतालच्या इमारतीत पसरली नाही. त्यामुळे मोठी हानी टळली. मात्र, या इमारतीतील सामान जळून खाक झाले आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.