नागपूर एकदा भाजपात प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली की पुढे काय काय होते सगळ्यांनाच माहित आहे मी बावनकुळेंना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देत नाही असे म्हणत माझ्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढून नका अशी टिप्पणी गडकरी यांनी नागपुरमध्ये केली आहे यावेळी व्यासपीठावर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते State President of BJP Chandrashekhar Bawankule आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला जाईल हे लक्षात येताच गडकरी यांनी मुख्यमंत्री फडणवीसच होतील मात्र त्यांना केंद्रात बोलावले तर बावनकुळे तुमच्या नावाचाही विचार होऊ शकतो असही गडकरी यावेळी म्हणाले आहेत
अप्रत्यक्ष काँग्रेसच्या घराणेशाहीवर निशाणा सर्वसामान्य कार्यकर्ता असलेले चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष झाले भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्यांची पार्टी आहे. खासदाराच्या पोटातून खासदार आणि पंतप्रधानांच्या पोटातून पंतप्रधान होत नाही एखाद्याचा मुलगा असणे किंवा मुलगी असणे हा गुन्हा नाही मात्र त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने ते मिळवावे असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अप्रत्यक्ष काँग्रेसच्या घराणेशाहीवर निशाणा साधला आहे
कोणी माझा मुलाला तिकीट द्या म्हंटले तर मी विरोध करेल देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या वडिलांसोबत काम केले मात्र त्यांनी मला असे कधीही म्हटले नाही की देवेंद्रला राजकारणात घ्या पण देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कर्तृत्वाने नगरसेवक ते मुख्यमंत्री पद मिळवले त्यामुळे आपल्या पक्षात खासदार आमदारांनी माझ्या मुलाला आमदार, खासदार करा असे म्हणू नये नाही तर मी विरोध करेल असही गडकरी म्हणाले आहेत पण त्याचा मुलाला जनता म्हणत असेल तर नक्कीच पक्षाने विचार करावा असेही गडकरी म्हणाले आहेत
वीज कनेक्शन जोडणीचा बॅकलॉक भरून काढला बावनकुळे यांनी रिक्षावाल्यापासून आपला प्रवास सुरू केला त्यांनी छत्रपती सेनेच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांसाठी काम केले त्यांनी स्वतच्या कर्तृत्वाने नागपूर जिल्ह्यात भाजप पक्ष मजबूत करण्याचे काम केले पक्ष वाढवण्यात सिहाचा वाटा बावनकुळे यांचा आहे असेही गडकरी बोलतांना म्हणाले आहेत त्यांनी झोकून देऊन त्यांनी काम केले त्यांनी ऊर्जामंत्री म्हणून मोठे काम केले शेतकऱ्यांना वीज कनेक्शन जोडणीचा बॅकलॉक भरून काढला असही ते म्हणाले
सामान्य कार्यकर्ता म्हणून बावनकुळे यांनी स्वतःला सिद्ध केलेत कोणत्याही व्यक्ती जोपर्यंत कामाची जबाबदारी स्वीकारत नाही तोपर्यंत गरिबांचे काम होऊ शकत नाही असा सल्ला कार्यकत्यांना दिला नागपूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांसाठी बावनकुळे यांनी सत्ता नसताना काम केले तिकीट मिळाले नसताना त्यांनी काम सोडले नाही तर पक्षासाठी विदर्भात फिरून काम केले त्यांच्याजागी दुसरा कोणी असता तर पक्षाला दाखवून देतो असा हिसका दाखवणारी भूमिका घेतली असती पण त्यांनी काम करून स्वताला सिद्ध केले
हेही वाचा - Har Ghar Tiranga मुंबईत दिव्यांगांनी बनवला तिरंगा ब्रेड सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम