ETV Bharat / city

Baby Needs 16 Crore Injection : सोळा महिन्यांच्या विहानला हवंय 16 कोटींचे इंजेक्शन, सोनू सूद आला मदतीला

स्पाईनल मस्कुलर ऍट्रॉफी ( एसएमए ) नामक दुर्मिळ आजाराने नागपुरच्या एका अवघ्या 16 महिन्यांच्या बाळाला ग्रासले आहे. विहान, असे या बाळाचे नाव आहे. डॉ. विक्रांत आणि मीनाक्षी आकुलवार यांचे बाळ असह्य वेदनांनी विव्हळत आहे. त्याच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी तब्बल 16 कोटी रुपये किंमतीच्या इंजेक्शनची गरज ( Baby Needs 16 Crore Injection ) आहे. महागडे इंजेक्शन विकत घेणे कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबाला अशक्य आहे. त्यामुळे आता क्राऊड फंडिंगच्या ( Crowdfunding ) माध्यमातून एक मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी अभिनेता सोनू सूदनेही स्वतः मदत करत नागपुरात येऊन आकुलवार कुटुंबियांची भेट घेतली. इतकेच नाही तर पत्रकार परिषद घेत वर्गणी जमा करण्यासाठी आवाहन केले आहे.

16 कोटींचे इंजेक्शन
16 कोटींचे इंजेक्शन
author img

By

Published : Apr 25, 2022, 5:46 PM IST

Updated : Apr 26, 2022, 5:17 PM IST

नागपूर - स्पाईनल मस्कुलर ऍट्रॉफी ( Spinal Muscular Atrophy ) नामक दुर्मिळ आजाराने नागपुरच्या एका अवघ्या 16 महिन्यांच्या बाळाला ग्रासले आहे. विहान, असे या बाळाचे नाव आहे. डॉ. विक्रांत आणि मीनाक्षी आकुलवार यांचे बाळ असह्य वेदनांनी विव्हळत आहे. त्याच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी तब्बल 16 कोटी रुपये किंमतीच्या इंजेक्शनची गरज ( Baby Needs 16 Crore Injection ) आहे. 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन विकत घेणे कोणत्याही सर्वसामान्य आई वडिलांसाठी अशक्य आहे. त्यामुळे आता क्राऊड फंडिंगच्या ( Crowdfunding ) माध्यमातून एक मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्यामध्ये अभिनेता सोनू सूद, अभिषेक बच्चन, मनोज बायपेयी या सारख्या अभिनेत्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. विहान हा आता 16 महिन्यांचा आहे. त्याला पुढील 2 महिन्यात हे इंजेक्शन देणे गरजेचे आहे, उशीर झाल्यास इंजेक्शनचा प्रभाव कमी होईल अशी भीती त्याच्या आई वाडीलांना आहे.

सोळा महिन्यांच्या विहानला हवंय 16 कोटींचे इंजेक्शन

नागपुरात राहणारे आकुलवार दाम्पत्याच्या घरी 16 महिन्यांपूर्वी एका गोंडस बळाने जन्म घेतला. बाळाच्या जन्माने आपले कुटुंब पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद आकुलवार दाम्पत्याला होता. त्यांनी मोठ्या उत्साहात बाळाचे नाव विहान, असे ठेवले. बघता बघता विहान कधी एक वर्षांचा झाला हे त्यांना कळलेच नाही. विहानचा वाढदिवस कुटुंबातील सर्वांनी एकत्र येत साजरा केला. इतर बाळांप्रमाणे विहानच्या शरीराची वाढ तर होत होती. पण, त्याच्यातील काही बाबींकडे आकुलवार दाम्पत्याला दुर्लक्ष करता आले नाही. विहानच्या पायातील बोटांमध्ये सजीवता होती. मात्र, त्याचे पाय निकामी होत असल्याची जाणीव झाली. त्यानंतर सुरू झाला अनेक रुग्णालयाचा प्रवास.

विहानला स्पाईनल मस्कुलर ऍट्रॉफी नामक आजार - सुरुवातीला नागपूरच्या डॉक्टरांकडे उपचार झाल्यानंतर विहानच्या आई वडिलांनी मुंबई गाठली. तेथेही फार काही फरक पडत नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ते बंगळुरूला गेले. अखेर तिथे विहानला स्पाईनल मस्कुलर ऍट्रॉफी (एसएमए) नावाचा आजार असल्याचे निदान झाले. हा आजार तसा दुर्मिळ असल्याने यावर उपचार करण्यासाठी खूप खर्च येईल याची कल्पना आकुलवार दाम्पत्याला आली होती. मात्र, जेव्हा यावर उपचारासाठी जगात एकच इंजेक्शन उपलब्ध असून त्याची किंमत 16 कोटी रुपये असल्याचे कळताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. पुढील दोन महिन्यात हे 16 कोटी रुपये किमतीचे इंजेक्शन विहानला द्यावे लागणार असल्याने त्याचे आईवडील चिंतेत आहेत.

विहानसाठी मदतीचे आवाहन - विहानला दुर्मिळ आजराने ग्रासले आहे आणि त्याच्या उपचाराचा खर्च अपेक्षेच्या कितीतरी बाहेर असल्याने आता सर्व काही संपले अशीच भावना त्यांच्या मनात घर करत असताना काही मित्रांनी विहानवर उपचार करण्यासाठी एक मोहीम हाती घेतली. त्याअंतर्गत अभिनेता सोनू सूद, अभिषेक बच्चन या सारख्या कलावंतांना मदतीचे साकडे घालण्यात आले. चिमुकल्या विहानच्या मदतीसाठी अनेकांनी पुढाकार घेतला. त्यात सोनू सूदचा सहभाग सर्वात मोठा आहे. नागरिकांनी इम्पॅक्ट गुरू प्लॅटफॉर्म आणि गो फंड प्लॅटफॉर्म जाऊन सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन केले आहे.

विहानसाठी नागपूरकरांनी एकत्र यावे - सोनू सूद - विहानवर उपचार करण्यासाठी तब्बल 16 कोटी रुपयांची गरज असल्याने क्राउड फंडिंगच्या माध्यमातून ही रक्कम जमा करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अभिनेता सोनू सूद सर्वात पुढे ( Sonu Sood ) आहे. सोनू सूदने विहानच्या कुटुंबाला कोणतीही कल्पना न देता थेट नागपूर गाठले आणि विहानची भेट घेतली. एवढ्यावर तो थांबला नाही, त्याने एक पत्रकार परिषद घेऊन विहानला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

12 कोटींची गरज - विहानला 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन मिळावे यासाठी क्राउड फंडिंगच्या माध्यमातून 4 कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित 12 कोटी रुपये पुढील महिन्याभरात जमा करण्याचे मोठे आव्हान आकुलवार दाम्पत्यासमोर आहे. मार्ग कठीण असला तरी अशक्य नाही. त्यामुळे मीनाक्षी आणि डॉ. विक्रांत आकुलवार यांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.

हेही वाचा - ST Bus Service Resumed : अच्छे दिन; संपकरी कर्मचारी कामावर परतल्याने लालपरीने धरला वेग, प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

Last Updated : Apr 26, 2022, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.