ETV Bharat / city

Disaster Management Competition : राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक स्पर्धा संपन्न; अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर - राज्य राखीव पोलीस दल आणि आपत्ती प्रतिसाद दल

राज्य राखीव पोलीस बल ( State Reserve Police Force nagpur ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल महाराष्ट्र करिता फिल्ड क्राफ्ट ट्राफी स्पर्धा ( Field Craft Trophy Competition ) आयोजीत करण्यात आली होती. यामध्ये विविध संघांनी आपत्तीच्या वेळी उपयोगी सिद्ध होणारे विविध चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले.

प्रात्यक्षिक स्पर्धा
प्रात्यक्षिक स्पर्धा
author img

By

Published : Feb 16, 2022, 8:09 PM IST

Updated : Feb 16, 2022, 8:23 PM IST

नागपूर - अप्पर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस बल यांच्या संयुक्त विद्यमानाने नागपूर येथे राज्य राखीव पोलीस बल ( State Reserve Police Force nagpur ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल महाराष्ट्र करिता फिल्ड क्राफ्ट ट्राफी स्पर्धा ( Field Craft Trophy Competition ) आयोजीत करण्यात आली होती. यामध्ये विविध संघांनी आपत्तीच्या वेळी उपयोगी सिद्ध होणारे विविध चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले. आपत्ती व्यवस्थापन प्रात्याक्षिक ट्रॉफी स्पर्धेत एफडब्लुआर, एमएफआर व हायराईज, एमएफआर या दोन आपत्ती विषयक प्रात्याक्षिकांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर या दलाने उत्कृष्ठरित्या सादरीकरण करुन प्रथम क्रमांक पटकविले आहे. तर सीएसएसआर, एमएफआर या आपत्ती विषयक प्रात्याक्षिकांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर व राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे या दलांना मिळून प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे.

प्रात्याक्षिक सादर करतांना जवान

आपत्ती ही प्राकृतिक असो किंवा मानवनिर्मित ही केवळ आर्थिक, सामाजिक व्यवस्थेला प्रभावीत करते आणि देशाच्या विकासला मागे घेवून जाते. आपत्ती ही एक असामान्य घटना आहे. आपण आपत्तीला रोखु शकत नाही. परंतू त्यांचा पासून होणारे नुकसानीची दाहकता कमी करता येते. या प्रत्याक्षिकामध्ये बचावकर्तांचे व साहित्यांचे योग्य नियोजन करुन क्रमनिहाय अडकलेल्या जखमी व्यक्तींचा शोध घेणे. त्यांच्यापर्यंत पोहचणे आणि त्यांना स्थिर करुन सुरक्षितरित्या घटनास्थळातून बाहेर काढणे तसेच त्यांचेवर प्रथमोपचार करुन त्वरीत वैद्यकीय उपचाराकरिता वैद्यकीय अधिकारी आपातकालीन सेवा यांच्याकडे रितसर सोपविणे क्रमप्राप्त आहे. आपत्ती व्यवस्थापन प्रात्याक्षिक ट्राफी स्पर्धेत आपत्ती प्रतिसाद दल नागपूर आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे या दोन दलांमध्ये स्पर्धा रंगली.

चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर

राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर यांचे नेतृत्वामध्ये टीममधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पुर परिस्थितीमधील बचाव कार्य, एमएफआर ( Flood Water Rescue + Medical First Responder ) मध्ये पुर आणि अतिवृष्टीच्या पाण्यामध्ये अडकलेल्या व्यक्तींना शोधणे. त्यांचेपर्यंत पोहचवणे व त्यांना स्थिर करुन सुरक्षितरित्या बाहेर काढणे तसेच त्यांचेवर प्रथमोपचार करुन त्वरीत वैद्यकीय उपचाराकरिता वैद्यकीय अधिकारी आपातकालीन सेवा यांच्याकडे रितसर सोपविण्याचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले.

हेही वाचा - Sholay Style Protest : आरमोरीतील कंत्राटी कामगारांचे गडचिरोलीतील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

Last Updated : Feb 16, 2022, 8:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.