नागपूर - शहरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या टीबी वॉर्ड परिसरातील इमारतीचा स्लॅब कोसळून एका रुग्णासह महिलेचा दबून मृत्यू झाला आहे. तसेच १ महिला गंभीर जखमी झाली आहे. देवराव बागडे (वय 66) आणि वनिता वाघमारे (वय 39) अशी मृतांची नावे आहेत.
हेही वाचा... झोक्याचा फास लागून शाळकरी मुलाचा मृत्यू; नांदेडच्या पळसपूरची घटना
देवनाथ बागडे हे चर्मरोगाच्या उपचारासाठी गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. तर वनिता वाघमारे या त्यांच्या नातेवाईकाला पाहायला आल्या होत्या. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास रुग्णालयाच्या चर्मरोग विभागाच्या इमारतीचा पोर्च अचानक कोसळला. त्याखाली दबून या दोघांचा मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली आहे.
-
Additional Commissioner of Police, BG Gaikar: The man who died, was a patient here. Two women were injured. It will be investigated that when and by whom was this building built. https://t.co/JFvNH2c7PG pic.twitter.com/BfY8csfNRq
— ANI (@ANI) December 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Additional Commissioner of Police, BG Gaikar: The man who died, was a patient here. Two women were injured. It will be investigated that when and by whom was this building built. https://t.co/JFvNH2c7PG pic.twitter.com/BfY8csfNRq
— ANI (@ANI) December 12, 2019Additional Commissioner of Police, BG Gaikar: The man who died, was a patient here. Two women were injured. It will be investigated that when and by whom was this building built. https://t.co/JFvNH2c7PG pic.twitter.com/BfY8csfNRq
— ANI (@ANI) December 12, 2019
हेही वाचा... यश अपयशातून उभे राहण्याची उर्जा आईकडून मिळाली - शरद पवार
देवराव बागडे हे आजारी होते आणि या रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले होते. यावेळी त्यांना भेटायला दोन महिला नातेवाईक आल्या होत्या. ते या सज्जा खाली बसले असताना सज्जा त्यांच्या अंगावर पडला. तेव्हा देवराव यांचा आणि नातेवाईकाला पहायला आलेल्या वनिता यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्या तिघांनाही अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त बी.जी. गायकर यांनी दिली आहे.