ETV Bharat / city

शॉर्टसर्किटमुळे भंगारच्या दुकानाला आग, लाखोंचे नुकसान - nagpur scrap shop fire news

शुक्रवारी सकाळच्या सुमारास नागपूरच्या खरबी चौकात असलेल्या एका भंगारच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. भंगारच्या दुकानात ज्वलनशील वस्तू असल्याने बघता-बघता आगीने भीषण रूप धारण केलं होतं.

nagpur scrap shop fire news
नागपुरात भंगाराच्या दुकानाला आग
author img

By

Published : Nov 6, 2020, 4:12 PM IST

नागपूर - शुक्रवारी सकाळच्या सुमारास नागपूरच्या खरबी चौकात असलेल्या एका भंगारच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे. भंगारच्या दुकानात ज्वलनशील वस्तू असल्याने बघता-बघता आगीने भीषण रूप धारण केलं होतं. या घटनेत लाखो रुपयांचे नुकासन झाले आहे.

नागपुरात भंगाराच्या दुकानाला आग

घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमनदलाच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. खरबी परिसरातील ज्या भंगाराच्या दुकानाला आग लागली होती, ते दुकान वर्दळीच्या ठिकाणी आहे. आग पसरण्यापूर्वीच अटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

हेही वाचा - नागपूर विद्यापीठाच्या पीएचडी पूर्वपरीक्षेत बदल होण्याची शक्यता

हेही वाचा - सीसीटीव्ही : चोरट्याने लंपास केली मंदिराची दानपेटी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.