नागपूर: पांजरी टोल नाक्याशेजारी एक ढाबा आहे. तेथे मालकाने सुरक्षेच्या उद्देशाने काही कुत्रे पाळली आहेत. त्यातील तीन छोटी पिल्ले उन्हात झोपली असताना धाब्यावर काम करणारे काही कर्मचारी तेथे आले, त्यापैकी एकाने तीनही कुत्र्यांच्या पिल्लांना बदडून ठार मारले,
त्या पिल्लांचे मृतदेह नंतर कुंपणाच्या पलीकडे फेकून देत पोबारा केला. रेस्टॉरंटचे मालकाने कुत्र्यांच्या पिल्लांचा शोध घेतला तेव्हा त्यांना हा प्रकार सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर लक्षात आला. या प्रकरणी सेव्ह स्पिचलेस ऑर्गनायझेशन कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.