ETV Bharat / city

Nagpur : शिवसेना खासदार कृपाल तुमानेंचा दावा फोल, राणा दाम्पत्याचा व्हिडीओ जारी करणार असल्याचा केला होता दावा - कृपाल तुमाने नवनीत राणा व्हिडीओ

राणा दाम्पत्याचा व्हिडीओ ( Navneet Rana Video In Jail ) आणि दोघांवर होणारी कारवाई शिवसेनेच्या नेत्यांकडे उपलब्ध आहे, असे रामटेक लोकसभेचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने ( Shivsena Mp Krupal Tumane PC ) यांच्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. मात्र, त्यांचा दावा फोल ठरला असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Nagpur
Nagpur
author img

By

Published : Apr 28, 2022, 9:13 PM IST

नागपूर - मातोश्री बाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा हट्ट धरल्याने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( Navneet Rana Video In Jail ) आणि त्यांचे पती बडनेराचे आमदार रवी राणा सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या मागे एकाद्या तपास यंत्रणांचा ससेमिरा लागावा तसे शिवसेनेचे नेते हातधून लागले आहेत. पोलीस राणा दाम्पत्यावर आता काय कारवाई करणार आहेत? कोणता व्हिडीओ जारी करणार आहेत? याची इत्यंभूत माहिती शिवसेनेच्या नेत्यांकडे उपलब्ध आहे, असे रामटेक लोकसभेचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने ( Shivsena Mp Krupal Tumane PC ) यांच्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. तुमाणे यांनी दावा केला होता की, आज दुपारी तीन वाजता काही व्हिडिओ मुंबई पोलिसांकडून सर्वांसमोर ठेवले जातील. त्यामुळे राणा दाम्पत्याचे पाय पुन्हा खोलात जातील. मात्र, त्यांचा हा दावा फोल ठरला असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया

पोलिसांचा ऍक्शन प्लॅन शिवसेना नेत्यांकडे कसा? - नवनीत राणांकडून राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्या संदर्भात मुंबई पोलीस काही लेटेस्ट व्हिडिओ जारी करतील. ज्यामुळे नवनीत राणा यांचे पितळ उघडे पडेल, असा दावा कृपाल तुमाने यांनी केल्याने खळबळ माजली होती. मात्र, तसे काहीच घडले नसल्याने तुमाणे तोंडघशी पडले आहेत. शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी केलेल्या दाव्यानुसार राणा प्रकरणात पोलीस पुढे काय करणार आहे. तपासात काय समोर येत आहे, याची आगाऊ माहिती शिवसेना नेत्यांना असते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर पोलिसांच्या अँक्शनची आगाऊ माहिती शिवसेना नेत्यांना मिळत असेल, ती माहिती कोण देते, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

काय म्हणाले होते तुमाने? - आज राणा यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना तर आज भेट द्यावीच लागेल. हनुमानजीने त्यांना आधीच भेट दिली आहे, असे ही तुमाने म्हणाले. तुम्ही देवाचा गैरवापर करू लागले आणि देवा बद्दल खोटं बोलले तर असेच बक्षिष मिळेलच आणि तो हनुमानजीने दिलाच आहे, असे तुमाने म्हणाले होते.

हेही वाचा - Maharashtrian Family Suicide : महाराष्ट्रीयन कुटुंबाची भुवनेश्वरमध्ये गळफास घेत आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.