नागपूर - केंद्रीय मंत्री नारायण राणे विरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्यभर राणे यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलन सुरू असताना नागपुरातील शिवसैनिकांनी राणा प्रताप पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. यावेळी आंदोलकांनी राणे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे. तर, कान्हेर यांनी राणे यांच्यावर टीका करत ते महाराष्ट्रच्या राजकारणातील ग्रहण आहेत, असे म्हटले आहे.
राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे नारायण राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ते सध्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्ताने कोकण दौऱ्यावर आहेत. नाशिक आणि पुणे येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांनीही तक्रारी दिल्या आहेत. नागपूर येथे सुद्धा शिवसेनेचे राज्य प्रवक्ता किशोर कान्हेरे यांनी राणा प्रताप नगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.
राणे महाराष्ट्राच्या राजकारणातील ग्रहण - कन्हेरे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी केलेल्या बेताल वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेनेकडून सुरू आंदोलन नागपुरात देखील बघायला मिळाले. नारायण राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेले ग्रहण आहेत, अशी टीका किशोर कन्हेरे यांनी यावेळी केली आहे.
काय म्हणाले होतो राणे?
'देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. ड्रायवरच नाही', असे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रायगड येथे म्हटले होते.
हेही वाचा - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अशी केली अटक, बघा VIDEO