ETV Bharat / city

उड्डाणपूल अपघातानंतर राजकारण तापले; कामाचा दर्जा घसरल्याचा आरोप करत शिवसेनेचे आंदोलन - bhandara

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निर्माण करण्यात येत असलेल्या पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर यावर राजकारण सुरू झाले आहे. पुलाच्या कामात दिरंगाई होत असताना आता पुलाच्या गुणवत्तेच्या संदर्भात प्रश्न निर्माण झाले असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मंगळवारी (दि. 19) कळमना परिसरात ज्या ठिकाणी उड्डाणपुलाचा काही भाग खाली कोसळला होता. त्या ठिकाणीच शिवसेनेच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले आहे.

अपघात
अपघात
author img

By

Published : Oct 20, 2021, 7:43 PM IST

Updated : Oct 20, 2021, 8:29 PM IST

नागपूर - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निर्माण करण्यात येत असलेल्या पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर यावर राजकारण सुरू झाले आहे. पुलाच्या कामात दिरंगाई होत असताना आता पुलाच्या गुणवत्तेच्या संदर्भात प्रश्न निर्माण झाले असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मंगळवारी (दि. 19) कळमना परिसरात ज्या ठिकाणी उड्डाणपुलाचा काही भाग खाली कोसळला होता. त्या ठिकाणीच शिवसेनेच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले आहे.

आंदोलक

पूर्व नागपूरच्या भंडारा मार्गावरील कळमना ते पारडी या ठिकाणी उड्डाणपुलाचे निर्माण कार्य सुरू असताना मंगळवारी (दि. 19) रात्री पुलाचा एक भाग कोसळल्या अपघात झाला. लोड बेरिंग सिस्टीम फेल झाल्याने दोन पिलरच्यामध्ये असलेले गर्डर खाली कोसळले. सुदैवाने त्यावेळी घटनास्थळी काम बंद होते आणि जड वाहनांची वाहतूकही सुरू झाली नसल्याने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.

गडकरींच्या विभागात कामाचा दर्जा घसरला- शिवसेना

उड्डाणपूलाचा काही भाग कोसळून अपघात झाल्याच्या 12 तासानंतरच या विषयाच्या अनुषंगाने राजकारण सुरू झाले आहे. शिवसेनेने नागपूर महानगरपालिकेत आणि केंद्रात सत्ता असलेल्या भाजप विरोधात आंदोलन सुरू केले आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या विभागाचा काम योग्य नसून नागपुरात विविध रस्त्यांचे आणि उड्डाणपुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याचा आरोप करत शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले आहे.

हेही वाचा - नागपूर उड्डाणपूल अपघात : नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा

Last Updated : Oct 20, 2021, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.