ETV Bharat / city

ED Raid in Nagpur : फडणवीसांविरोधातील सर्व पुरावे लॅपटॉप आणि मोबाईल मध्ये, ईडीने तेच जप्त केले; शेखर उके यांचा आरोप - सतीश उके ईडी

देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील सर्व पुरावे लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये असल्याने केवळ लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यासाठीच आजची कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप सतीश उके यांचा भाऊ शेखर उके यांनी केला आहे.

शेखर उके
शेखर उके
author img

By

Published : Mar 31, 2022, 1:12 PM IST

नागपूर - राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील अनेक पुरावे वकील सतिश उके यांनी गोळा केले होते. याची माहिती त्यांनाही समजली होती. त्यामुळेच आज ईडीने सतीश उके यांच्यावर कारवाई केली असल्याचा गंभीर आरोप सतिश उके यांचे धाकटे बंधू शेखर यांनी केला आहे. ईडीच्या कारवाईनंतर ते मीडिया सोबत बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील सर्व पुरावे लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये असल्याने केवळ लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यासाठीच आजची कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शेखर उके यांचा आरोप

सर्व माहिती फोन आणि लॅपटॉपमध्ये - वकील सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यापैकी एकाचा निकाल येत्या काही दिवसांमध्ये लागणार आहे. भविष्यात देखील अनेक प्रकरणे बाहेर काढण्याची ते तयारी करत होते. म्हणूनच सतीश उके यांच्यावर ईडी कडून कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप शेखर उके यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील अनेक याचिकेतील पुरावे सतीश उके यांच्या लॅपटॉप आणि मोबाईल मध्ये असल्याने ईडीने लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा - ED Raid in Nagpur : कोण आहे ईडीच्या रडारावरील वकील सतीश उके? 'या' प्रकरणांमध्ये उके यांची महत्त्वाची भूमिका

लपटॉपमध्ये अनेक पुरावे - भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर विविध प्रकारचे आरोप वकील सतीश उके यांनी केलेले आहेत. त्यापैकी बहुचर्चित आर्किटेक्चर एकनाथ निमगडे हत्याकांड, जस्टिस लोया मृत्यू प्रकरण आणि देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूकीच्या शपथपत्रात दिलेली खोटी माहितीचे अनेक पुरावे लॅपटॉप मध्ये आहे. ते पुरावे नष्ट करण्यासाठीच आजची कारवाई करण्यात आली असल्याचा दावा शेखर ऊके यांनी केला आहे.

महिनाभरापासून सुरू होती रेकी - ईडीच्या पथकाने यांच्या घरी पहाटे साडेपाचच्या सुमारास वकील सतीश उके यांच्या घरी सर्च कारवाई केली. मात्र गेल्या एका महिन्यापासून ईडीचे अधिकारी आमच्या घराची रेकी करत असल्याचा आरोप शेखर उके यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.