ETV Bharat / city

हुतात्मा भूषण सतईच्या वडिलांची मुलाच्या विरहातून आत्महत्या - nagpur crime news

रमेश धोंडू सतई हे फैलपुरा काटोल येथे राहात होते. त्यांचा मुलगा भारतीय सैन्यदलात होता. मात्र, गेल्यावर्षीत काश्मीर खोऱ्यात सेवेत असताना पाकिस्तानकडून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 13 नोव्हेंबरला त्याला वीरमरण आले. त्यामुळे वडिलांनी मुलाच्या विरहात गळफास लावून आत्महत्या केली.

मुलाच्या विराहातून आत्महत्या
मुलाच्या विराहातून आत्महत्या
author img

By

Published : Jun 22, 2021, 7:46 AM IST

Updated : Jun 22, 2021, 10:42 AM IST

नागपूर - काटोल येथील हुतात्मा भूषण सतई यांच्या वडिलांनी मुलाच्या विरहात गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी (ता.21) सकाळी घरातील स्नानगृहाच्या छताला दुपट्टा बांधून त्यांनी हा गळफास लावला आहे. रमेश धोंडू सतई असे त्यांचे नाव आहे. मुलाला वीरमरण झाल्यापासून अस्वस्थ होते. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबियांकडून बोलले जात आहे.

रमेश धोंडू सतई हे फैलपुरा काटोल येथे राहात होते. त्यांचा मुलगा भारतीय सैन्यदलात होता. मात्र, गेल्यावर्षीत काश्मीर खोऱ्यात सेवेत असताना पाकिस्तानकडून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 13 नोव्हेंबरला त्याला वीरमरण आले. त्यामुळे वडिलांनी मुलाच्या विरहात गळफास लावून आत्महत्या केली.

दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आल्याचा त्यांना अभिमान होता. पण, तेव्हापासून सतई कुटुंबाला ते एकाकी पडल्याचे जाणवले. यातून ते एकटे राहणे, जास्त न बोलणे, शांत होऊन चिंतेत असयाचे. यामुळे ते नैराश्यात गेले असावे. मुलाचा विरह सहन न झाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांचा मृत्यू गळफास लागल्याने झाल्याची पुष्टी झाली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
हेही वाचा - ग्रामपंचायत शिपाईचा वाढदिवस साजरा करणे उपसरपंच व सदस्यांना पडलं महागात

Last Updated : Jun 22, 2021, 10:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.