नागपूर - उपराजधानी नागपूरात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढ होत आहे. यात रुग्णांना ऑक्सिजनची प्रचंड मागणी वाढली आहे. या सर्व परिस्थिती कुठलीही गंभीर घटना घडून हकनाक कोणाचा बळी जाऊ नये, यासाठी उपाययोजनांची गरज आहे. यात उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांची नव्याने 20 मेट्रिक टनचा ऑक्सिजन टॅंक हा कोविडच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आले आहे.
नागपूरचे सर्वाधिक मोठे कोविड हॉस्पिटल म्हणून शासकीय रुग्णलयाचा आहे. आताच्या घडीला 900 कोविड बेड आहे. यात कोरोनाच्या रुग्णामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज निर्माण होत आहेत. यात दररोज आयनॉक्स एअरकडून लिक्विड टँकरच्या माध्यमातून ऑक्सिजनचा साठा केला जात आहे.
हेही वाचा -रेमडेसिवीरमध्ये ग्लुकोज भरून वीस हजाराला विकणारे पाच जण ताब्यात