ETV Bharat / city

Nagpur Scorpio Swept Away in Flood : स्कॉर्पिओ गेली पुराच्या पाण्यात वाहून; तीन जणांचा मृत्यू, तिघांचा शोध सुरू - नागपूर

सतरापूर आणि नांदा गावादरम्यान वाहणाऱ्या नाल्यात आज दुपारी पूर आला होता. त्यामुळे नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत होते. त्यातच एका स्कॉर्पिओ चालकाने स्कॉर्पिओमध्ये सहा लोक बसलेले असताना पुलावरून गाडी काढण्याचा धाडस केले. मात्र त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्याने गाडी ही थेट नदी पात्रात गेल्याची घटना घडली आहे. यातील तीन जणांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती मिळत आहे. ( Scorpio swept away in flood waters at Nagpur )

Breaking News
स्कॉर्पिओ पुराचा पाण्यात गेली वाहून
author img

By

Published : Jul 12, 2022, 5:08 PM IST

Updated : Jul 12, 2022, 10:46 PM IST

नागपूर - सतरापूर आणि नांदा गावादरम्यान वाहणाऱ्या नाल्यात आज दुपारी पूर आला होता. त्यामुळे नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत होते. त्यातच एका स्कॉर्पिओ चालकाने स्कॉर्पिओमध्ये लोक बसलेले असताना पुलावरून गाडी काढण्याचा धाडस केले. मात्र त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्याने गाडी ही थेट नदी पात्रात गेल्याची घटना घडली ( Scorpio swept away in flood waters at Nagpur ) आहे. यातील तीन जणांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती मिळत आहे.

स्कॉर्पिओ गेली पुराच्या पाण्यात वाहून

वाहन चालकाचे धाडस नडले - नागपूरच्या सावनेर तालुक्यातील नांदगाव गोमुख यागावी मध्यप्रदेश मधील बैतुल येथिल सहा जण पाहुणे म्हणून आले होते. परतीच्या मार्गावर दुपारी अडीच वाजताच्या सुमारास परतीला जात असतांना पुलावर पाण्याचा प्रवाह वाढल्याने स्कॉर्पिओ अडकली. यावेळी काहींनी दोर देऊन त्याना बचावाचा प्रयत्न केला. पण पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की प्रयत्न अयशस्वी ठरले आणि वाहून गेलेत. यात वाहून गेलेल्या सहा पैकी तीन लोकांचे मृत्यूदेह मिळून आले. यात दोन महिला आणि एक वयोवृद्ध यांचा मृतदेह आहे. तेच तीन जण बेपत्ता असलेल्यामध्ये दोन पुरूष आणि एका मुलाचा समावेश आहे. या वाहन चालकाचा धाडसीपणा तीन जणांचा जीवावर बेतला आहे. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ही स्कॉर्पिओ गाडी जवळपास पाचशे मीटर दूरवर जाऊन पोहचली. त्या ठिकाणी काचा फोडून तीन लोकांचे मृतदेह बाहेर काढले आहे. उर्वरित जणांचा शोध घेण्यासाठी एसडीआरफ पथक आले आहे. पुढील शोधमोहीम करण्यासाठी सध्या अडचणी जात असल्याने उद्या मोहीम सुरू होईल अशी माहिती पुढे येत आहे.

स्कॉर्पिओ गेली पुराच्या पाण्यात वाहून; तीन जणांचा मृत्यू

स्कॉर्पिओमध्ये थेट पाण्यात - मात्र तेवढ्यात पाण्याचा लोंढा आला आणि पाण्याच्या धक्क्यामुळे पुलावरून स्कॉर्पिओ नाल्याच्या प्रवाहात वाहत गेली. सध्या पुलापासून काही अंतरावर स्कॉर्पिओ पाण्यात अडकलेली दिसत आहे. दरम्यान या घटनेत स्कॉर्पिओमध्ये बसलेले तीन जण मृत्युमुखी पडले आहेत तर तीन जणांचा शोध असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अनेक जिल्ह्यात अलर्ट - कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी १४ जुलैपर्यंत मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसाठी पुढील ३ दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील आठवड्यापासून राज्यभरात विविध ठिकाणी मुसळधार (Heavy rain) तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. येणारे काही दिवस राज्यभर अश्याच पद्धतीने पाऊस राहणार आहे. तर राज्यातील पालघर,रायगड, कोकण आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यात पुढील तीन दिवस रेड अलर्ट (Pune On Red Alert) देण्यात आला आहे. तर कोल्हापूर येथे देखील अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडुन (Meteorological Department) देण्यात आला आहे.

Nagpur latest news
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केली मदत जाहीर

मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर - नागपूर जिल्ह्यातील नांदागोमुख छत्रापूर येथील पुलावरुन कार वाहून गेल्याने त्यातील सहा जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचे ऐकून दु:ख झाले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्पण केली. यात या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याने बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे युद्धपातळीवर केला जात आहे. एनडीआरएफची सुद्धा मदत घेतली जात आहे. नागपूर जिल्हाधिकार्‍यांशी यासंदर्भात संपर्कात असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट द्वारे दिली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल असेही म्हटले आहे.

हेही वाचा - Alangun Dam Burst : नाशकात पावसाचा कहर ! अलंगून बंधारा फुटला अन् डोळ्या देखत वाहून गेलं गाव !

Last Updated : Jul 12, 2022, 10:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.