नागपूर - तरुणाचा जोश नक्कीच प्रेरक आहे. तरुणाई उत्साहाचे प्रतीक आहे. पण तो जोश क्षणिक नसावा. 2047 मध्ये भारत मोठा करायचा असेल तर त्या तरुणाईमध्ये ताकद जोश पाहिजे पाहिजे. मात्र त्या दिशेने काम करण्यासाठी होश असला पाहिजे. आपल्याला भारत मोठा करायचा आहे. त्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागेल. त्या देशाला मोठा करण्याची कहाणीचा इतिहास हा घाम आणि रक्ताने लिहिलेला आहे, अशा शब्दांत सरसंघचालक मोहन भागवत Sarsangchalak Mohan Bhagwat यांनी युवा पिढीला मार्गदर्शन केले. ते नागपुरात केशव भट सभागृहात अखंड भारत दिवसानिमित्य 2047 मध्ये भारताचे व्हिजन आणि ऍक्शन या विषयावर व्याख्यान मालेत बोलत होते.
भारताची रक्षा करण्यासाठी जे तयार आहे त्यांच्यासाठी आजचा भारत आहे. 2047 व्हिजन आणि एक्शन यासाठी बलिदान द्यावे लागेले. कुठलही ध्येय गाठण्यासाठी संकल्पशक्ती पाहिजे. जेणेकरुन मोठं होण्यासाठी भारतीय पद्धतीने काम करायचे आहे. अमेरिका मोठा झाला तो आपली व्यवस्था सांभाळण्यासाठी दंडा चालवत असतो. तो चीन मोठा झाला, पण स्वतःच्या शक्तीचा उपयोग दुसऱ्या देशाचे तुकडे करून आपले साम्राज्य पसरवण्यासाठी केला आहे. आपल्या असा भारत निर्माण करायचा नाही, जेव्हा भारत मिळाला ज्ञानसंपन्न होता. संपूर्ण अस्तित्वाचे एकतेचे ज्ञान असलेला भारत होता. आपल्या भारत विविधतेत एकता देणारा आहे. सर्वाना सोबत घेऊन कसे चालायचे हे भारतापासून इतर देश शिकत आहे. आपल्या भारत निर्माण करण्याचे दायित्व आपल्यावर आहे. ज्या भारताने संपूर्ण विश्वातील विविधता एकतेच्या एका धाग्यात बांधण्याचे काम केले आहे.
भारतीय संस्कृती ही इ.स. पूर्व 9 हजार वर्षे कमीत कमी जुनी आहे. ती संस्कृती शोधण्यासाठी आपल्याला वास्तविकता निर्माण करायचा आहे. ते शोधण्याचे काम करायचे आहे. इंग्रज सत्ता आल्यानंतर आपण सगळं धुन टाकत जात पाट धर्म उभे करत अधर्म निर्माण केले आहे. कोणाला त्रास देण्याचे काम आपले नाही. आपल्या संपर्ण भावना निर्माण करायची आहे. युवा पिढीने भारत समजून घेतले पाहिजे. आपल्या शिक्षा करणेच नाही तर क्षमा करणेही शिकले पाहिजे. आपल्याला स्वतःक ताकदीवर सामर्थ्यवाण बनून इतरांना वाचवण्याचे काम आपल्याला शिकले पाहिजे, असा संदेश युवा पिढीला दिला आहे. दुसऱ्याचा भेद त्यागण्याची भूमिका घेण्याची गरज आहे. संपूर्ण भारत आपला आहे. आपण अखंड भारताची गोष्ट करताना भितो पण भिऊन चलनार नाही, असेही भागवत म्हणाले.
भारत हा अहिंसेच्या पुजारी आहे. पण दुर्बलतेचा पुजारी नाही तर शक्तीचा पुजारी आहे. आपल्याला भारत मोठा करत असताना लहान लहान गोष्टीतही लक्ष द्यावे लागणार आहे. यासाठी परिश्रम घ्यावे लागेल. यात स्वच्छतेच्या मोहीम आपल्याला आपल्या देशात राबवावी लागत आहे, तरीसुद्धा रस्त्याच्या दोन्ही बाजूने घाण साचलेली दिसून येतात हे चित्र बदलले पाहिजे. भारताला मोठं करण्याची तपस्या करावी लागणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले पाहिजे, अनुशासन लावले पाहिजे. जे काम करायचे ते उत्कृष्ट झाले पाहिजे. आपल्याला कर्माने सर्वश्रेष्ठ झाले पाहिजे, असा संदेश भारताने दिला आहे, असेही यावेळी बोलताना सरसंघचालक म्हणाले.