ETV Bharat / city

Chandrashekhar Bawankule : सरपंच, नगराध्यक्षांची निवड पुन्हा जनतेतून होणार?, बावनकुळे म्हणाले...

सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड यापूर्वी सदस्यांमधून केली जात होती. तो निर्णय बदलून आता पुन्हा एकदा येणाऱ्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेमधून निवडून यावा ( Sarpanch And Mayor Will Be Directly Elected People ), अशी मागणी भाजप नेते बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी केली आहे.

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule
author img

By

Published : Jul 6, 2022, 4:09 PM IST

नागपूर - भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेमधून निवडून यावा, अशी मागणी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी केली आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांची भेट घेऊन बावनकुळे यांनी मागणी केली आहे. या महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा निर्णय घेण्यात यावा, असा आग्रह देखील त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केला आहे. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी तो निर्णय बदलून नगराध्यक्ष आणि सरपंचाची निवड नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्यांमार्फत करण्यात ( Sarpanch And Mayor Will Be Directly Elected People ) यावी, असे आदेश दिले होते.

"ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय रद्द करावा" - देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना नगरपंचायती मध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून यायचे. त्यामुळे पाच वर्ष नगरपालिकेत खेचाखेची राजकारण होत नव्हते, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. सत्तांतरानंतर महाविकास आघाडीने देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय बदलून नगराध्यक्ष आणि सरपंच हे जनतेतून निवडून न येता त्यांची निवड निवडून आलेल्या सदस्यांच्या मार्फत केली जाण्याच्या संदर्भात निर्णय घेतला. मात्र, आता पुन्हा सत्तांतर झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केला आहे.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी

"पावसाळी अधिवेशनात कायदा करा" - 'नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांना यासंदर्भात विनंती केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा कायदा बदलावा. नगराध्यक्ष आणि सरपंच जनतेतून निवडून आणण्याच्या संदर्भात नवीन कायदा तयार करावा. या मुद्द्यावर मुख्यमंत्री दिलासा देतील,' असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

"ओबीसींना हे सरकार न्याय देईल" - 'महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात गठित केलेल्या आयोगाचं काम गांभीर्याने सुरू नाही आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये याबाबतची बैठक घेतली आहे. ओबीसी समाजाचा अचूक डेटा तयार करण्यासाठी लवकरच प्रयत्न केले जातील. ओबीसींना हे सरकार न्याय देईल, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - Raj Thackeray : शिंदे गट मनसेत सामील होणार?, बंडखोर आमदाराने राज ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चेला उधाण

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.